‘दृश्यम द कन्क्लूजन’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; 500 कोटींचा टप्पा पार!
Drishyam The Conclusion Box Office Collection; अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा पहिलाच 500 कोटींचा जागतिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Drishyam The Conclusion Box Office Collection: ‘दृश्यम द कन्क्लूजन’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या 11 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgan) कारकिर्दीतील हा पहिलाच 500 कोटींचा जागतिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने दुसरे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, भारतातही चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 300 कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईचा टप्पा ओलांडला आहे.
जिद्द, चिकाटी आणि रूढीवादी समजुती मोडून काढणारी एक प्रभावी कथा; सुमो दीदीचा ट्रेलर प्रदर्शित!
जगभरातील प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा हा अंतिम भाग बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही कायम; प्रेम, विरह आणि जगण्याचा सूर बनलेला अवलिया
विजय साळगावकर आणि त्याच्या अफलातून बुद्धिचातुर्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. सध्या तरी या चित्रपटाची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. विजय साळगावकरची शेवटची चाल पाहण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात ‘दृश्यम द कन्क्लूजन’ नक्की पाहा!