Pathan : 13 व्या दिवशीही पठानची बॉक्सऑफीसवर घौडदौड सुरूच

Pathan Cast Fee Revealed Deepika Padukone Shah Rukh Khan John Abraham Takes Home Massive Paycheck 001

मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 850 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 850 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड आवडल्या असून त्यांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

दुसऱ्या रविवारी म्हणजे 13 व्या दिवशी भारतात 8.25 कोटी कमावले. 13 दिवसांत पठाणने परदेशात 323 कोटी कमावले. तर भारतात चित्रपटाने 438.45 कोटी कमावले. त्यामुळे चित्रपटाची जगभरातील कमाई आता 800 कोटींच्या घरात गेली आहे.

पठाण आता हिंदी चित्रपटातील जगभरातील सर्वांत जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. तसेच तो यशराज फिल्म्सचा स्पाय युनिव्हर्स चित्रपटांपैकी तो सर्वांत जास्त कमाई करणार चित्रपट ठरला आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वार आणि पठाण या यशराज फिल्म्सचा स्पाय युनिव्हर्स चित्रपट आहेत.

Tags

follow us