‘Evil Dead Burn’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी पूर्णपणे थकून गेले होते; अभिनेत्री सुहैला याकूबचा खुलासा
Evil Dead Burn या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री Souheila Yacoub हिला या चित्रपटाचा थरार चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच अनुभवायला मिळाला.
Evil Dead Burn script I was completely exhausted after reading actress Alyssa Sutherland reveals : हॉररपट प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी ओळखले जातात. मात्र Evil Dead Burn या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री Souheila Yacoub हिला या चित्रपटाचा थरार चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच अनुभवायला मिळाला. चित्रपटाची पटकथा पहिल्यांदा वाचल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेल्याचे तिने सांगितले.
Krishna Mohan : राम मंदिराचे अंतरिम महासचिव माजी IFS अधिकारी कृष्ण मोहन कोण आहेत?
चित्रपटातील ‘अॅलिस’ ही भूमिका साकारणाऱ्या सुहैलाने सांगितले की, पटकथा वाचायला सुरुवात केल्यानंतर ती मध्येच थांबवावी, असे तिला अनेकदा वाटले. मात्र पुढे काय घडणार, याची उत्सुकता इतकी होती की ती पुस्तक खाली ठेवूच शकली नाही. ती म्हणाली, “पटकथा पूर्ण वाचल्यानंतर मी अक्षरशः थकून गेले होते. विशेषतः माझ्या पात्रासाठी इतक्या घटना सतत घडत राहतात की कधी हे संपणार, असा प्रश्न पडत होता. सतत अॅक्शन, रक्तरंजित प्रसंग आणि संघर्ष… हे सगळं वाचताना मला अॅलिसचीच कीव येत होती.”
अहिल्यानगरच्या प्रसिद्ध भंडारदरा धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळं बंद
सुहैलाच्या मते, पटकथेतूनच दिग्दर्शक Sébastien Vanicek यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीची स्पष्ट झलक दिसत होती. “त्यांची दृश्य मांडण्याची पद्धत अतिशय वेगवान, रांगडी आणि आक्रमक आहे. त्यामुळे हा चित्रपटही तितकाच तीव्र आणि दमदार असेल, याची मला आधीच कल्पना आली होती,” असे ती म्हणाली. चित्रपटात सुहैला ‘अॅलिस’ ही भूमिका साकारत आहे. प्रेमासाठी फ्रान्समधून अमेरिकेत आलेली अॅलिस पतीच्या अचानक मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास भाग पडते. त्याचवेळी त्या कुटुंबावर अलौकिक संकटांचे सावट येते आणि अॅलिसलाही स्वतःच्या आयुष्यातील दडपून ठेवलेल्या भावना आणि संघर्षांना सामोरे जावे लागते.
महायुतीत शरद पवार गटाची ग्रँड ‘एंट्री’ होणार?; पाटील–तावडेंची पडद्यामागे खलबतं
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सुहैला म्हणाली, “अॅलिसचा भावनिक प्रवास हा भयपट सुरू होण्याआधीच सुरू झालेला असतो. प्रेमासाठी तिने स्वतःचा देश सोडला, अनेक तडजोडी केल्या आणि त्या प्रक्रियेत स्वतःलाच विसरली. तिच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा होती, पण पतीच्या मृत्यूनंतर ती अशा आयुष्यात अडकून पडते, जिथून बाहेर पडणं तिच्यासाठी सोपं नसतं.”
चित्रपटातील भीषण घटना उलगडत जात असताना अॅलिसच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग आणि वेदना अखेर बाहेर पडतात. “तिने इतकी वर्षे मनात दडवून ठेवलेल्या भावना एका टप्प्यावर फुटून बाहेर येतात आणि ती अखेर आपल्या मनातील सगळं बोलून दाखवते,” असेही सुहैलाने सांगितले. दिग्दर्शक सेबॅस्टियन व्हॅनिसेक यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही तिने खास असल्याचे सांगितले. “ते कलाकारांच्या कल्पनांना नेहमीच प्रोत्साहन देतात. सेटवर ते एखाद्या लहान मुलासारखे उत्साही असतात आणि त्यांचा तो उत्साह संपूर्ण टीममध्ये पसरतो,” असे ती म्हणाली.
Cristiano Ronaldo : रोनाल्डोचे स्वप्न अधुरेच, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला
विशेष म्हणजे, सुहैला स्वतः हॉररपटांची चाहती नव्हती. तिला सहज भीती वाटत असल्यामुळे तिच्या एका मित्राने मूळ The Evil Dead चित्रपटातील भीतीदायक दृश्यांच्या जागी मांजरांची गोंडस दृश्ये आणि विनोदी टिपण्या जोडून खास आवृत्ती तयार केली होती. या अनोख्या भेटीमुळे तिला ‘Evil Dead’ मालिकेशी भीती न वाटता परिचित होता आले.
मात्र चित्रीकरण सुरू झाल्यानंतर या भूमिकेची खरी कसोटी लागली. जड उपकरणे हाताळणे, तासन्तास भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक दृश्यांचे चित्रीकरण करणे हे अपेक्षेपेक्षा अधिक कठीण असल्याचे तिने सांगितले. “कितीही तयारी केली तरी अशा भूमिकेसाठी पूर्णपणे तयार होता येत नाही. अनेक तास हातात जड मशीन घेऊन रडणे, धावणे, ओरडणे आणि अभिनय करणे हा अत्यंत कठीण अनुभव होता,” असे ती म्हणाली.
या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना सुहैलाच्या मते ‘Evil Dead Burn’ हा पारंपरिक भयपटांपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट आहे. “या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतील, ज्या त्यांनी यापूर्वी कधीच पाहिलेल्या नाहीत. सेबॅस्टियन यांच्या धाडसी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट वेगळाच ठरतो. तो रांगडा, तीव्र आणि प्रत्येक वळणावर आश्चर्यचकित करणारा आहे,” असे ती म्हणाली. Sony Pictures Entertainment तर्फे ‘Evil Dead Burn’ हा चित्रपट 10 जुलै रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.