‘हिंदी चित्रपटसृष्टीत काश्मीरचं प्रतिनिधित्व… आमच्यासाठी सन्मान’; फहीम अब्दुल्ला, अर्सलान निजामी यांचं ‘सैयारा’ मधून पदार्पण

‘हिंदी चित्रपटसृष्टीत काश्मीरचं प्रतिनिधित्व… आमच्यासाठी सन्मान’; फहीम अब्दुल्ला, अर्सलान निजामी यांचं ‘सैयारा’ मधून पदार्पण

Faheem Abdullah Arsalan Nizami Debut with Saiyara Movie : यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रख्यात दिग्दर्शक मोहित सूरी यांचा आगामी चित्रपट ‘सैयारा’, ज्यामध्ये नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा झळकणार आहेत. 2025 मधील सर्वात जास्त प्रतीक्षा असलेला प्रेमकथनपट मानला जातो. मंगळवारी वाईआरएफ ने चित्रपटाचा (Saiyara Movie) टायटल ट्रॅक अधिकृतपणे प्रदर्शित केला. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम लाभले. या गाण्याच्या निमित्ताने फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निजामी या दोन काश्मिरी संगीत कलाकारांचं हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood Movie) पदार्पण झालं आहे.

मोहित सूरी यांनी खास निवडलेल्या फहीमने या आत्म्याला भिडणाऱ्या टायटल ट्रॅकला आवाज दिला आहे. त्याच्या संगीतिक सामर्थ्याची प्रचिती यात मिळते. या गाण्याचं संगीत तनिष्क बागची, अर्सलान आणि फहीम यांनी एकत्रितपणे तयार (Entertainment News) केलं असून, ज्येष्ठ गीतकार इरशाद कामिल यांनी त्याचे हृदयस्पर्शी बोल लिहिले आहेत.

फहीम अब्दुल्ला म्हणतो, ‘सैयारा’ च्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत काश्मीरचं प्रतिनिधित्व करायला मिळणं, ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. आमचा प्रदेश जितका सुंदर आहे, तितक्याच अद्वितीय कलाकारांनी तो समृद्ध आहे. हे पाहून आनंद होतो की, दोन काश्मिरी मुलांनी प्रचंड मेहनतीने आयुष्यातील हे स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वत:चं नाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला आमच्या लोकांना अभिमान वाटावा असं काहीतरी करायचं आहे. माझं गाणं ‘साय्यारा’च्या प्रचाराची सुरुवात करत आहे, हे अत्यंत नम्र करणारी गोष्ट आहे.

मोठी बातमी! अभिनेता डिनो मोरीयाच्या घरी ईडीची छापेमारी

तो पुढे म्हणतात,“हा क्षण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि शुभचिंतकांसाठी खूप भावनिक आहे. ‘‘सैयारा’ हा आजवर ऐकलेला सर्वात पवित्र गीतांपैकी एक आहे आणि मी तनिष्क बागची आणि मोहित सूरी यांच्या मार्गदर्शनात माझं संपूर्ण मन त्यात ओतलं आहे. माझा मित्र अर्सलान शिवाय हे जादू शक्य झालं नसतं, त्यामुळे हे यश मी त्याच्यासोबत शेअर करतो.”

अर्सलान निजामी म्हणतो, दोन वर्षांपूर्वी जर कोणी सांगितलं असतं की मला हिंदी चित्रपटासाठी गाणं कंपोझ करण्याची संधी मिळेल, तर मी यावर विश्वासच ठेवला नसता. आणि मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनात काम करण्याची संधी मिळेल, हे तर स्वप्नातही आलं नव्हतं! माझ्या करिअरसाठी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मला खूप अभिमान वाटतो. मी, फहीम आणि तनिष्क बागची यांनी एकत्र बनवलेलं हे गाणं ‘‘सैयारा’ च्या प्रचाराची सुरुवात करतंय, हे खरंच स्वप्नवत आहे.

रेपो दरात कपात, सर्वसामान्य माणसांना फायदा काय? जाणून घ्या सर्वकाही

तो पुढे म्हणतो, माझा विश्वास बसत नाही. मी नि:शब्द आहे. दोन काश्मिरी मुलं मुंबईत आहेत आणि संपूर्ण देशाला दाखवत आहेत की आम्ही काय करू शकतो—याचा खूप अभिमान वाटतो. आम्ही अजून कठोर मेहनत करणार आहोत आणि आमच्या राज्याचा अभिमान वाढवणार आहोत. मोहित सूरी सरांचे आभार, ज्यांनी आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले आहेत.

वाईआरएफ च्या संगीत परंपरेचा आणि मोहित सूरी यांच्या आत्म्याला भिडणाऱ्या शैलीचा सुरेख संगम असलेलं हे गाणं ‘सैयारा’ मधील भावनात्मक गहराईची झलक दाखवतं. गाण्याच्या व्हिडिओमध्ये अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळते. जे या चित्रपटातून यशराजचे नवोदित नायक आणि नायिका म्हणून पदार्पण करत आहेत.वाईआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘साय्यारा’ 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube