फौजी’च्या दिग्दर्शक हनू राघवपुडी यांनी सांगितली प्रभासच्या भूमिकेबद्दल खास गोष्ट, घ्या जाणून नक्की काय आहे?
कर्ण यांसारख्या पौराणिक योद्ध्यांची नावेही दिसत आहेत. अलीकडील एका मुलाखतीत दिग्दर्शक हनू राघवपुडी यांनी यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले
भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाउसेसमधील एक मैथ्री मूव्ही मेकर्स यांनी आपल्या बहुचर्चित चित्रपट ‘फौजी’ची अधिकृत घोषणा केली आहे. या ब्लॉकबस्टर प्रोजेक्टसाठी स्टुडिओने भारतीय सिनेमाचे सुपरस्टार प्रभास यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. (Film) या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘सीता रामम’ प्रसिद्ध दिग्दर्शक हनू राघवपुडी करणार आहेत. अलीकडेच मेकर्सनी याचे ग्रँड टायटल पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात प्रभासचा दमदार आणि जोशपूर्ण लूक पाहायला मिळतो. पोस्टर रिलीज होताच इंटरनेटवर खळबळ उडाली असून चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह दिसत आहे.
रोचक बाब म्हणजे, पोस्टरमध्ये अर्जुन आणि कर्ण यांसारख्या पौराणिक योद्ध्यांची नावेही दिसत आहेत. अलीकडील एका मुलाखतीत दिग्दर्शक हनू राघवपुडी यांनी यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले, “‘फौजी’मध्ये प्रभास असा सैनिक साकारत आहेत जो सामान्य नाही, तर असामान्य आहे. मला त्यांच्या भूमिकेत काही पौराणिक वीरांचे गुण दिसावेत असे वाटले. माझ्यासाठी अर्जुन, कर्ण आणि एकलव्य हे तिन्ही वेगवेगळे पण अत्यंत सामर्थ्यवान नायकत्वाचे प्रतीक आहेत — कौशल्य, त्याग आणि समर्पण. ते पुढे म्हणाले, मी विचार केला, जर कर्णाने महाभारतात पांडवांची बाजू घेतली असती, तर युद्धाचे परिणाम पूर्णपणे वेगळे झाले असते. हाच विचार मला या चित्रपटाची कल्पना देऊन गेला. मी जास्त सांगू शकत नाही, पण इतके नक्की सांगतो की ही एक अॅक्शनने भरलेली कथा आहे, जी 1940 च्या ब्रिटिश काळातील आहे.
कांताराची बॉक्स ऑफिसवर जादू ! दिवाळीत खेचली गर्दी, तब्बल 852 कोटींची कमाई
‘फौजी’ ही ‘बाहुबली’ नंतर प्रभासची एक भव्य पुनरागमन म्हणता येईल. यावेळी तो एका जुन्या काळातील महान कथेसह परतत आहे, जी दृश्यरित्या सुंदर आणि मनाला भिडणारी असेल. मैथ्री मूव्ही मेकर्सचा हा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात प्रभास, ‘पुष्पा’चे निर्माता आणि ‘सीता रामम’चे दिग्दर्शक हनू राघवपुडी हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लोक या संयोगाला “दोन पिढ्यांचा संगम” असे म्हणत आहेत. चित्रपटाचा टॅगलाइन आहे – “The bravest tale of a soldier” म्हणजेच “एका धाडसी सैनिकाची कहाणी”. या चित्रपटात एका अशा सैनिकाची कथा दाखवली जाणार आहे, ज्याने आपल्या शौर्य आणि धैर्याने सर्वांची मने जिंकली.
मैथ्री मूव्ही मेकर्स – ज्यांनी ‘पुष्पा’, ‘उप्पेना’आणि ‘डिअर कॉम्रेड’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत – आता ही भव्य फिल्म बनवत आहेत. असे म्हटले जात आहे की, या वेळी कंपनी अप्रतिम व्हिज्युअल्स आणि मनाला भिडणारा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करत आहे. त्यामुळेच याला भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक मानले जात आहे.
