‘Gadar-2’च्या दिग्दर्शकांची नामी शक्कल; 3 चित्रपटांना फाईट देण्यासाठी खेळला मोठा डाव

‘Gadar-2’च्या दिग्दर्शकांची नामी शक्कल; 3 चित्रपटांना फाईट देण्यासाठी खेळला मोठा डाव

Gadar Ek Prem Katha: दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांचा 2001 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गदर2 एक प्रेम कथा’ (Gadar 2) पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 9 जून रोजी पुन्हा प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासोबतच निर्मात्यांनी एक जबरदस्त ऑफर आजमावली आहे.

मिळालेला माहितीनुसार चित्रपटाची तिकिटे 150 रुपयांना विकली जाणार आहेत, त्यासोबतच एक मस्त ऑफर देखील दिली जात आहे. या चित्रपटाचे तिकीट विकत घेणाऱ्या व्यक्तीला एक सोबत मोफत तिकीट दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाचा सीक्वल गदर २ या वर्षी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 22 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होत असलेल्या ‘गदर एक प्रेम कथा या चित्रपटाने मोठा निर्णय घेतला आहे.

निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 150 रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे, आणि एक तिकीट खरेदी केले तर तुम्हाला एक तिकीट विनामूल्य मिळणार आहे. हा चित्रपट मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी त्याचा प्रीमियर होणार आहे, ज्यासाठी चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिवंगत अमरीश पुरी आणि आनंद बक्षी यांच्या कुटुंबीयांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट गदर एक प्रेम कथा 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्यावेळी हा चित्रपट 19 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने 133 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आता त्याचा सीक्वल घेऊन येत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या सिक्वेलमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube