गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगणार ‘देवघर ऑन रेंट’चं ‘अगं आई गं’

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ठसकेबाज नृत्याने सजलेलं ‘अगं आई गं’ हे धमाकेदार गाणं मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 23T212211.967

Devghar On Rent : ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी (Marathi) चित्रपटातील ‘अगं आई गं’ हे जल्लोषपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, गौतमी पाटीलच्या ठसकेबाज नृत्यामुळं या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची कथा एका रहस्यमय देवघराभोवती फिरते. पोलिसांचा पाठलाग, गुन्हेगारी आणि सूडाच्या प्रवासासोबत अध्यात्माची भावनिक किनारही कथेला मिळाली आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.

‘अगं आई गं’ हे गाणं अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीताचा संगम साधणारं नृत्यगीत आहे. गौतमी पाटीलच्या लयबद्ध नृत्याबरोबरच तिच्या हावभावांनी गाण्याला वेगळा रंग दिला आहे. सहकलाकारांची धमाल आणि रंगीबेरंगी वातावरणामुळं गाणं लक्षवेधी ठरत आहे. संजय नवगिरे यांनी गीतलेखन केलं असून कबीर शाक्य यांनी संगीत दिलं आहे. मुग्धा कऱ्हाडे यांच्या दमदार आवाजात हे गाणं साकारलं आहे.

द फिक्समधील पहिल्या हॉलिवूड मुख्य भूमिकेसाठी एलनाझ नोरौझीचे अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक !

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. स्वरूप सावंत यांनी दिग्दर्शन केलं असून, पूनम चौधरी पाटील यांची संकल्पना आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत.

‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी सांभाळली आहे. किशोर दळवी यांनी कोरिओग्राफी केली असून चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत, तर राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये कला दिग्दर्शक दिलीप कंधारे, वेशभूषाकार अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषाकार सुजीत सुरवसे यांच्यासह इतर कलाकार व तंत्रज्ञांचा समावेश आहे.

follow us