उत्तम कथा, स्टारकास्ट मानसी नाईकचा “मन आतले मनातले” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Man Aatale Manatle हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.
Great story, star cast Manasi Naik’s “Man Aatale Manatle e” will be released soon : आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास”, चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत “मन आतले मनातले” या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक अभिनेता सुरेन महापात्रा, अभिनेता उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
अतिशय नावीन्यपूर्ण कथा, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. या कथेतून मानवी आयुष्याचे वेगवेगले पदर, भावभावना उलगडण्यात आल्या आहेत. सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने आजवर ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ, बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता “मन आतले मनातले” या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठीमध्ये पदार्पण करत आहे.
