Gullak 4 OTT : ‘गुलक सीझन 4’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Gullak 4 OTT : ‘गुलक सीझन 4’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Gullak 4 OTT Release Date: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT) सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक असलेल्या ‘गुलक’च्या सीझन 4 च्या (Gullak 4) रिलीजची तयारी सुरू झाली आहे. ही सिरीज मिश्रा कुटुंबाची कथा आहे. आई-वडील संतोष आणि शांती आणि त्यांची मुले अन्नू आणि अमन. यामध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मायार यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर सुनीता राजवार त्यांच्या शेजाऱ्याची भूमिका साकारत आहेत. शिवाय सिरीजची ओटीटी रिलीज डेट (OTT Release ) देखील समोर आली आहे. गुलक सीझन 4 कधी आणि कुठे पाहता येईल चला तर मग जाणून घ्या…

‘गुलक सीझन 4’ ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होईल?

गुलक सीझन 4′ च्या ओटीटी रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. रविवारी निर्मात्यांनी या सिरीजचा ट्रेलर रिलीज केला आणि त्याची रिलीज डेटही जाहीर केली. हा ‘गुलक सीझन 4’ ओटीटी प्लॅटफॉर्म Sony Liv वर स्ट्रीम केला जाणार आहे. सिरीजच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना, Sony Liv ने लिहिले आहे की, “जीवनाचा खणखणीत आवाज घेऊन येत आहेत, गुलकच्या नवीन कथा येत आहेत. ‘गुलक सीझन 4’ केवळ 7 जूनपासून सोनी लिव्हवर प्रवाहित होत आहे.

‘गुलक सीझन 4’ ही मिश्रा कुटुंबाची कथा

श्रेयांश पांडे निर्मित ‘गुलक सीझन 4’ ही सिरीज द व्हायरल फीव्हर (TVF) द्वारे निर्मित आहे. या वेब शोची कथा मिश्रा कुटुंबाभोवती फिरते. या सिरीजमध्ये संतोषच्या भूमिकेत जमील खान, शांतीच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, अन्नूच्या भूमिकेत वैभव राज गुप्ता आणि अमनच्या भूमिकेत हर्ष मायर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ही सिरीज मिश्रा कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर आणि अनुभवांवर आधारित असून हृदयस्पर्शी क्षणांचे चित्रण आहे.

Balu Mamachya Navan Chagbhal मालिका रंजक वळणावर; बाळूमामांच्या आठवणीतील कथा उलगडणार

‘गुलक’चे तीनही सीझन आवडले

निर्मात्यांच्या मते, या सीझनमध्ये मिश्रा कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करण्यास तयार आहे. “गुलक” चा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याचा दुसरा सीझन 2021 मध्ये आला आणि तिसरा सीझन 2022 मध्ये आला. तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज