‘सतलज’साठी गुरुद्वारांमध्ये ठेवले गल्ले; मात्र दिग्दर्शकाने मदत स्वीकारण्यास दिला नकार

Gurdwaras raised funds for ‘Satluj’ ‘सतलज’वरील बंदीनंतर गुरुद्वारांनी आर्थिक मदत उभी केली; मात्र दिग्दर्शकाने ही मदत स्वीकारण्यास नकार दिला.

Satluj

Gurdwaras raised funds for Satluj : ‘सतलज’ या सिनेमाभोवतीचं वादळ अद्याप थांबलेलं नाही. दिग्दर्शक हनी त्रेहान (Honey Trehan) यांच्या या चित्रपटाचं भारतातील स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ते बंद करण्यात आलं. यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांचं आर्थिक नुकसान झालं. या परिस्थितीत ‘सतलज’च्या टीमच्या मदतीसाठी देश-विदेशातून अनेक जण पुढे आले असून, काही गुरुद्वारांनी थेट आर्थिक मदत जमा करण्यासाठी गल्ले ठेवले. मात्र, लोकांनी प्रेमापोटी उभ्या केलेल्या या मदतीचा स्वीकार करण्यास हनी त्रेहान यांनी स्पष्ट नकार दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.

E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘पंजाब 95’ ते ‘सतलज’… बराच काळ रखडलेला सिनेमा

‘सतलज’ची कथा मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा (Jaswant Singh Khalra) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचं पूर्वीचं नाव ‘पंजाब 95’ असं होतं. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता आणि बराच काळ त्याच्या प्रदर्शनाबाबत अनिश्चितता होती. अनेक चर्चांनंतर अखेर चित्रपटाचं प्रदर्शन झालं. 3 जुलै रोजी ZEE5 वर ‘सतलज’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, त्याचा हा प्रवास फार काळ टिकला नाही. अवघ्या 48 तासांतच भारतात या चित्रपटाचं स्ट्रीमिंग बंद करण्यात आलं. सरकारच्या निर्देशानंतर चित्रपट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या निर्मात्यांवर झाला आणि त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं.

चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; नागरिकांमध्ये संताप, पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह

सिनेमासाठी गुरुद्वारांमधून मदतीचा हात

‘सतलज’ भारतातून हटवल्यानंतर चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली. अनेकांनी सोशल मीडिया, फोन आणि मेसेजच्या माध्यमातून टीमशी संपर्क साधला. काही जणांनी तर निर्मात्यांचं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःहून मदत करण्याची तयारी दर्शवली. या मोहिमेत काही गुरुद्वारांचाही सहभाग असल्याचं हनी त्रेहान यांच्या पोस्टमधून समोर आलं. ‘सतलज’च्या टीमसाठी आर्थिक मदत जमा व्हावी यासाठी काही गुरुद्वारांमध्ये गल्ले ठेवण्यात आले. जमा झालेली रक्कम निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटासाठी धार्मिक संस्थांकडून अशा पद्धतीने आर्थिक मदत उभी केली जाणं ही लक्षवेधी बाब ठरली.

‘आमच्यासाठी तुमचं प्रेमच पुरेसं आहे’

गुरुद्वारांसह अनेकांकडून मिळणाऱ्या या पाठिंब्याबद्दल हनी त्रेहान यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, ही मदत स्वीकारणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितलं की, ‘सतलज’च्या टीमला पैसे, भेटवस्तू किंवा देणगी स्वरूपात कोणतीही मदत नको आहे. लोकांकडून मिळणारं प्रेम आणि पाठिंबा यालाच त्यांनी सर्वात मोठी ताकद म्हटलं आहे.

आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा

त्रेहान यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची गोष्ट सांगण्यासाठी बनवलेला नाही. इतिहासाच्या अंधाऱ्या काळात हरवलेल्या अनेक लोकांच्या वेदना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाला पडद्यावर मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे चित्रपटासाठी आर्थिक मदत स्वीकारण्याऐवजी लोकांनी दिलेलं प्रेम आणि समर्थन कायम राहणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं.

दिलजीत दोसांझनेही घेतलं नव्हतं मानधन

‘सतलज’मध्ये दिलजीत दोसांझ यांनी जसवंत सिंह खालरा यांची भूमिका साकारली आहे. या प्रोजेक्टशी त्यांचं असलेलं नातंही विशेष आहे. चित्रपटात काम करण्यासाठी दिलजीत यांनी मानधन घेतलं नसल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर भारतात स्ट्रीमिंग थांबवण्यात आल्यामुळे ‘सतलज’ सातत्याने चर्चेत आहे. आता गुरुद्वारांनी सिनेमाच्या टीमसाठी मदत उभी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हनी त्रेहान यांनी ती मदत नाकारल्याने या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’वर डोळा; डिस्ट्रिब्युशन राइट्ससाठी धर्मा, झी आणि पेन मरुधरमध्ये रंगली रेस

follow us