Adipurushवर हायकोर्टाचे ताशेरे; ‘धर्माचे चुकीचे वर्णन करू नये’, म्हणत सेन्सॉर बोर्डाला झापलं 

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T141832.224

Adipurush: बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. तर सिनेमाच्या निर्मात्यांना हायकोर्टाने चांगलेच झापले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने या सिनेमावर बंदी घालण्याच्या याचिकांवर सुनावणी करत असताना सांगितले आहे की, ‘सिनेमामध्ये ज्याप्रकारे धार्मिक व्यक्तिरेखा साकारले आहेत, त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत.

‘कायदा न्यायालय कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही. सर्व धर्मांच्या भावना समान आहेत.’ असंही कोर्टाने यावेळी सांगितले आहे. हा सिनेमा बनवत असताना सिनेमाच्या निर्मात्यांच्या मानसिकतेवर न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती प्रकाश सिंग यांच्या खंडपीठाने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तुम्ही कुराण, बायबल आणि इतर पवित्र ग्रंथांना हात लावू नका. तसेच याठिकाणी कोणत्याही एका धर्माविषयी चर्चा केली जात नाही. परंतु तुम्ही कोणत्याही धर्माचे चुकीचे वर्णन करू नका. तसेच न्यायालयाचा देखील स्वतःचा कोणता धर्म नाही.

Adipurush: “रामायण-कुराण यांसारख्या धर्मग्रंथांना तरी सोडा”; कोर्टाने निर्मात्यांना कडक भाषेत झापलं

परंतु कायदा आणि सुव्यवस्था याची काळजी आपण घेत असतो, असं कोर्टाने यावेळी सांगितले आहे. ‘सिनेमात ज्याप्रकारे धार्मिक व्यक्तिरेखा साकारले गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे भावना दुखावले आहेत. गेल्या काही दिवसाखाली अनेक सिनेमे आले आहेत. ज्यामध्ये हिंदू देवता आणि देवी विनोदी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे. तसेच ‘या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहेत.

एका सिनेमात तर असं दाखवण्यात आलं आहे की, भगवान शंकर त्यांच्या त्रिशूलसह अतिशय मजेदार पद्धतीने धावल्याचे दिसून आले आहे. या गोष्टी कशा दाखवले जातात? सिनेमाने त्यावर चांगला बिझनेस केला की, निर्माते पैसे कमवत असतात. एकोपा तोडण्यासाठी काहीतरी केले जात आहे. या विषयासाठी निर्मात्यांनाच पुढे येऊन काम करावे लागणार आहे. हा विनोदाचा विषय आहे का?’ असे देखील कोर्टानं फटकारले आहे.  यावर न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान म्हणाले की, ‘समजा तुम्ही कुराणावर डॉक्युमेंट्री तयार केली आणि त्यामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवले गेले तर काय होणार?

हे तुम्हाला देखील समजणार आहे. तसेच आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू शकतो की, ते कोणत्याही एका धर्माविषयी नाही. योगायोगाने हा मुद्दा रामायणाशी संबंधित आहे, अन्यथा न्यायालय सर्व धर्मांसाठी सारखेच आहे. न्यायालयाने हे देखील सांगितले आहे की, त्यांनी या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस आदेश दिला नाही. तसेच भारताचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी प्रमाणित केला आहे. याविषयी कोर्टाने देखील सांगितले आहे की, ‘तुम्ही म्हणताय की, सुसंस्कृत लोकांनी हा सिनेमा प्रमाणित केला आहे. ज्या सिनेमात रामायणाबद्दल असे दाखवले जात आहे, त्या सिनेमाला प्रमाणित करणारे ते लोक धन्य आहेत,  कोर्ट सध्या प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सॅनन स्टारर सिनेमाच्या संवादांविरोधात दाखल केलेल्या 2 जनहित याचिकेवर सुनावणी करत आहे.

Tags

follow us