Neetu Chandra: नितू चंद्राची ‘मैथिली’ भाषेतील प्रेमळ अंगाई गीत ऐकलात का?
Neetu Chandra: भारतीय हॉलीवूड (Hollywood) अभिनेत्री नितू चंद्रा (Neetu Chandra) ही तिच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलच्या अतुलनीय प्रेमासाठी ओळखली जाते. (Social media) मैथिली ही भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी इंडो-आर्यन भाषा (language) आहे. तिला तिच्या यूट्यूब चॅनेल बेजोड आणि चंपारण टॉकीज नावाच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे जागतिक व्यासपीठावर ही खास अंगाई घेऊन जाण्याची इच्छा तिने यावेळी व्यक्त केली आहे.
नितू चंद्रा हिने सांगितले आहे की “माझ्या यूट्यूब चॅनेलद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती जागतिक स्तरावर नेण्याचा माझा दृष्टीकोन आहे आणि या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, मी अबू धाबीमध्ये माझ्या प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केल आहे. सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे एक पाऊल आहे. बेजोड आणि चंपारण टॉकीज हे भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करतील यात शंका नाही.
निनिया राणी ही अंगाई नितीन नीरा चंद्रा यांनी दिग्दर्शित केली असून ज्यांचा मैथिली चित्रपट मिथिला मकानसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे सर्व जागतिक प्लॅटफॉर्मवर डिजिटल पद्धतीने प्रसिद्ध झाल असून जगभरातून या अंगाई गटाला प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.
नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. शिवाय साऊथच्या अनेक सिनेमातही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. यामुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Harshvardhan Kapoor: ओल्ड ट्रॅफर्ड येथे डेनिस इर्विनसोबत हर्षवर्धन कपूरची अनोखी भेट
तसेच १९९७ मध्ये हाँगकाँग येथे आयोजित वर्ल्ड ताइक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली नीतू कधीकाळी रणदीप हुड्डासोबत असलेल्या अफेअरमुळे जोरदार चर्चेत आली होती. त्यांची ही लव्हस्टोरी पडद्यावर येणार, अशीही मध्यंतरी चांगलीच चर्चा रंगली होती.