‘पठाण’ सेन्सॉरच्या कात्रीत, 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश

‘पठाण’ सेन्सॉरच्या कात्रीत, 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खानचा आगामी पठाण हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर 10 जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्याच्या बोलांवर तर काहींनी दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगाच्या बिकिनीवरुन आक्षेप घेतला. या वादांमुळेच सेन्सॉर बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत.

या चित्रपटातील ‘रॉ’ हा शब्द बदलून ‘हमारे’ आणि ‘लंगडे लुले’ऐवजी ‘टूटे फुटे’, ‘PM’ या शब्दाऐवजी ‘राष्ट्रपती किंवा मंत्री’ हे शब्द वापरले जाणार आहेत. याशिवाय ‘पीएमओ’ हा शब्द 13 ठिकाणावरून काढून टाकण्यात आला आहे. इतकेच नाही तर ‘अशोक चक्र’ला ‘वीर पुरस्कार’, ‘पूर्व केजीबी’ ऐवजी ‘पूर्व एसबीयू’ आणि ‘मिसेस भारतमाता’ बदलून ‘हमारी भारतमाता’ करण्यात आले आहे. याशिवाय ‘स्कॉच’ ऐवजी ‘ड्रिंक’ हा शब्द वापरला जाईल आणि ‘ब्लॅक प्रिझन, रुस’ याऐवजी ऐवजी आता फक्त ‘ब्लॅक प्रिझन’ हा शब्द प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube