नाशिक येथील मराठी संमेलनात दादासाहेब साहेब फाळके चित्रनगरीच्या दालनाचे उद्घाटन
विश्व मराठी संमेलनात मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी)चे आकर्षक दालन उभारण्यात आले आहे.
Inauguration of the gallery of Dadasaheb Phalke Chitranagari : नाशिक येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनात विविध प्रकाशक आणि शासकीय विभागांच्या दालनांबरोबरच मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी)चे आकर्षक दालन उभारण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे अध्यक्ष सदानंद मोरे तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी यांनी संमेलनाला भेट देणाऱ्या साहित्यप्रेमी नागरिकांना फिल्म सिटीच्या दालनास अवश्य भेट देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हे दालन अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने साकारण्यात आले असून विशेषतः तरुण पिढीसाठी येथे ‘कन्टेंट क्रिएशन’ची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्लास्टिक बंदी अधिक कठोर; उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
या दालनामध्ये तरुण मुला-मुलींना कॅमेऱ्यासमोर आपला कन्टेंट सादर करण्याची, स्वतःची लघुफिल्म तयार करण्याची आणि चित्रनिर्मिती प्रक्रियेतील विविध अंगांची माहिती जाणून घेण्याची संधी दिली जाणार आहे. चित्रपट निर्मितीमागील तांत्रिक आणि सर्जनशील पैलू समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. कुलकर्णी यांनी नाशिककरांसह विश्व मराठी संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींना या दालनाचा अनुभव घेण्याचे आणि चित्रनगरीतर्फे दिल्या जाणाऱ्या माहितीला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.
