Birth Anniversary : ‘कहां तुम चले गए’…मखमली आवाजाचे बादशाह जगजीत सिंह…

Birth Anniversary : ‘कहां तुम चले गए’…मखमली आवाजाचे बादशाह जगजीत सिंह…

मुंबई : आपल्या मखमली आवाजने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गजल सम्राट जगजीत सिंह यांची आज जयंती. जगजीत सिंहांनी आपल्या करिअरमध्ये अनेक गझलांना आपल्या मखमली आवाजाने आणखी सुंदर बनवले. पण चित्रपटांतील गाण्यांमुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…

जगजीत सिंह यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 ला राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला. त्यांचं मूळ नाव जगमोहन सिंह धीमान होत. जगजीत यांचं कुटूंब मूळचं पंजाबमधील रोपड़ जिल्ह्यातील होतं. त्यांचं सुरूवातीचं शिक्षण गंगानगरमध्ये झालं पुढील शिक्षण त्यांनी जालंधर येथे घेतलं. जगजीत सिंह यांचे वडील सरदार अमर सिंह धमानी सरकारी कर्मचारी होते. त्यांना संगीतमध्ये आवड होती. जगजीत यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनत मिळाला.

1965 मध्ये ते मुंबईत आले. येथे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पैसे कमावण्यासाठी लहान-लहान संगीत सभा आणि कार्यक्रमांमध्ये ते गाणे गात. चित्रपटांसाठी गाणी गाण्याची संधी मिळावी म्हणून ते सेलिब्रेटिंच्या पार्ट्यांमध्ये गाणे गात. 1970 आणि 1980 च्या दशकात त्यांनी पत्नी चित्रा सिंगसोबत एक उत्तम गझल गायली आणि देश-विदेशात आपल्या आवाजाची जादू पसरवली.

चित्रा सिंग आणि जगजीत सिंग यांची भेट एका रेडिओ जाहिरातीच्या रेकॉर्डिंगदरम्यान झाली होती. तिथून दोघांनी प्रेमाचा प्रवास सुरू केला आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. चित्रा ही जगजीत सिंहांची दुसरी पत्नी आहे. लग्न केले होते. डेबू प्रसाद दत्ता या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत. तिला एक मुलगी आहे. तर 10 ऑक्टोबर 2011 रोजी जगजीत यांचे निधन झाले.

अनेक मोठे पुरस्कारही त्यांना मिळाले. 1998 मध्ये त्यांना ‘मिर्झा गालिब’ चित्रपटातील चमकदार कामासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 2012 मध्ये राजस्थान सरकारने त्यांना मरणोत्तर राजस्थान रत्न देऊन सन्मानित केले. याशिवाय 2014 मध्ये जगजित सिंग यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने एक टपाल तिकीटही जारी केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube