Gautami Patil: ‘गौतमी घरी ये…! पाणावलेल्या डोळ्यांनी वडिलांची आर्त हाक
Gautami Patil: गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. (Video Viral) आपल्या तुफानी नृत्याने आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. सोबतच आपल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात सापडते. गौतमीचा कोणताही कार्यक्रम राड्याशिवाय पूर्णच होत नाही. (Gautami Patil) असं एक समीकरणचं बनलं आहे. ही झाली गौतमीची एक बाजू. अनेकांना गौतमी पाटीलच्या दुसऱ्या बाजूविषयी फारच कमी माहिती आहे.
View this post on Instagram
अनेकांना माहिती नसेल की, गौतमीने या क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक दुःख पाहिली आहेत. इतकंच नव्हे तर गौतमी पाटीलने जन्मापासून आपल्या वडिलांचं तोंडसुद्धा पाहिलं नव्हतं. तसेच जळगाव जिल्ह्यातील मुळची गौतमी पाटील (Gautami Patil) आहे. वेळोदे नावाचं तिचं गाव चोपडा तालुक्यातील आहे. या गावांमध्ये तिचे वडील रवींद्र बाबूराम पाटील हे एकटेच राहत आहेत. गावामध्ये तिच्या वडिलांचे पत्र्याचे घर आहे. हाताला मिळेल ते काम करत गौतमीचे वडील उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळाली आहे.
गौतमीच्या वडील दारूच्या अधीन गेलेले आहे. गौतमी पाटीलचा जन्म झाला, तेव्हा आईला वडिलांपासून त्रास सुरूच होता. शेवटी नवऱ्याला कंटाळून गौतमीची आई तिला घेऊन मामाकडे पुण्याला जाऊन राहायला लागली. गौतमीचे शिक्षण पुण्यात झालं आहे. गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. त्यामुळे गौतमीने आणि तिच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले. आता वेळोदे गावात गौतमीचे वडील एकटेच राहतात. लोक सध्या तिच्यावर टीका करत आहेत.
Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
दरम्यान गौतमीच्या ‘पाटील’ आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आडनावावरून टार्गेट करणाऱ्यांना गौतमीने पुन्हा एकदा चांगलंच सुनावलं आहे. यावेळी बोलत असताना तिने राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी (Gautami Patil) म्हणाली, “मला राजकारणातलं काही कळतं नाही. त्याचबरोबर मला त्यात काही इंटरेस्ट नाही. मी राजकारणात पडणार नाही.” ही प्रतिक्रिया दिल्यानंतर तिच्या राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.