‘Jawan’ Collection: 24 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ची क्रेझ, ‘गदर 2’ला केलं ओव्हरटेक

‘Jawan’ Collection: 24 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ची क्रेझ, ‘गदर 2’ला केलं ओव्हरटेक

Jawan Collection: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले जाते. पण आता ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान'(Jawan) नंतर तो अॅक्शनचा बादशहा बनला आहे. वर्षातील दोन सर्वात मोठे चित्रपट देणारा शाहरुख खान लवकरच ‘डिंकी’च्या (dinky) माध्यमातून तिसरा धमाका देणार आहे. बॉक्स ऑफीसवरील ‘जवान’ची क्रेझ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

24 दिवसांनंतरही ‘आझाद’ आणि ‘विक्रम राठोड’ची चाहत्यांमध्ये क्रेझ दिसून येतीय. आजही चित्रपटगृहे खचाखच भरलेली आहेत. तर 24 व्या दिवसापर्यंतचा ‘जवान’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Jawan Collection) आणि ‘गदर 2’ची बॉक्स ऑफीसवरील धमाका जाणून घेऊया.

शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा ​​अभिनीत ‘जवान’ने 24 व्या दिवशीही चांगली कमाई केली. चौथ्या शनिवारी त्याने शुक्रवारपेक्षा दुप्पट कमाई केली. हा आकडा पाहता चौथ्या रविवारी आणखी चांगली कामगिरी करू शकेल, असा अंदाज आहे.

काँग्रेसचा राज्यातील बडा नेता आयकरच्या रडारवर; 9 वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या सुतगिरणीवर छापेमारी

‘जवान’चे 24 व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk च्या अहवालानुसार, एटली दिग्दर्शित जवानने 24 व्या दिवशी 9.25 कोटी रुपये कमवले. तर 23 व्या दिवशी हा आकडा 5.5 कोटी रुपये होता. यासह हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये ‘जवान’चे नेट कलेक्शन 596.20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

वाघनखे कायमचे आम्हाला द्या; महाराष्ट्रातील दोन वाघ तुम्हाला देतो : शिंदे सरकारचा ब्रिटनला प्रस्ताव

‘जवान’ची जगभरातील कमाई
शाहरुख खानची जादू देशातच नाही तर जगभरात पाहायला मिळते. अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्येही या अभिनेत्याचे फॅन फॉलोइंग आणि मार्केटमध्ये क्रेझ आहे. यामुळेच शाहरुख खानचे चित्रपट परदेशातही चांगला व्यवसाय करतात. ‘फुक्रे 3’ आणि ‘द वॅक्सीन वॉर’ सारखे नवीन चित्रपट आले असूनही ‘जवान’च्या जगभरातील कलेक्शनने या 24 दिवसांत 1055 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube