वाघनखे कायमचे आम्हाला द्या; महाराष्ट्रातील दोन वाघ तुम्हाला देतो : शिंदे सरकारचा ब्रिटनला प्रस्ताव

वाघनखे कायमचे आम्हाला द्या; महाराष्ट्रातील दोन वाघ तुम्हाला देतो : शिंदे सरकारचा ब्रिटनला प्रस्ताव

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफलजखानाचा वध केला, ती वाघनखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. लंडन येथील व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे 16 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. प्राथमिक करारानुसार ही वाघनखे पुढील तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. याकाळात वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई इथल्या शासकीय संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार आहेत. (Give tiger claws permanently, then we give you a pair of tigers from Maharashtra Sudhir mungantiwar offer to Brittan)

यासाठीचा सामंजस्य करार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (1 ऑक्टोबर) रात्री लंडनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पुरातत्व विभागाचे संचालकही सोबत जाणार आहेत.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामुळे शरद पोंक्षे अडचणीत, 72 तासांची पाठवली नोटीस

दरम्यान,  करारानुसार वाघनखे पुढील तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. त्यानंतर ही वाघनखे व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियमला परत पाठविली जाणार आहेत. त्यामुळे काहीसा नाराजीचा सुर शिवभक्तांमधून उमटत आहे. त्यामुळे तीन वर्षांऐवजी ही वाघनखे कायमस्वरुपी भारतात यावीत यासाठी शिंदे सरकारने ब्रिटनला एक प्रस्ताव दिला आहे. यानुसार कायमस्वरुपी वाघनखे देण्याच्या बदल्यात महाराष्ट्रातील दोन वाघ (नरमादी जोडी) ब्रिटनला देण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबत 3 ऑक्टोबर रोजी एक बैठक होणार आहे, यानंतर नेमका काय निर्णय होते ते कळेल असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर : वाघनाखांवरील प्रश्नचिन्हावरुन भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका

दरम्यान, 3 वर्षांसाठी वाघनखे आणण्यात येणार असल्याच्या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की उसनवारी म्हणून? असे प्रश्न ठाकरे यांनी विचारले आहेत.  यावर मंत्री महोद्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube