Jawan : प्रतिभावान लेखक सुमित अरोरा याने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवीन प्रोजेक्ट ‘जवान’ चित्रपटाबद्दलचा उत्साह शेअर केला आहे. जवान हा त्याचा साठी नक्कीच खास आहे. असं तो म्हणतोय चित्रपटाला शुभेच्छा देतो आहे. त्याने या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटाच्या अनोख्या प्रवासाबद्दलची खास गोष्ट यातून शेअर केली आहे.
Pankaja Munde : नुसत्या घोषणा नको, आरक्षणासाठी अभ्यासगट नियुक्त करा
सुमित अरोराचा उत्साह स्पष्ट आहे कारण त्यांनी ‘जवान’ साठी संवाद लिहिले आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या असंख्य प्रोजेक्ट मधला वेगळे पणा यातून त्याने मांडला आहे.
मराठा अन् ओबीसी आरक्षणाचं कोडं कसं सोडवणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान…
सुमित अरोरा यांनी ते ट्विटरवर ट्विट करून सांगितलं, अवघ्या काही तासांत #जवान तुमचे सर्वस्व असेल. मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे पण हा खूप खास चित्रपट आहे. मला फक्त जवानांसाठी संवाद लिहिण्यातच मजा आली नाही तर एक सर्जनशील व्यक्ती म्हणूनही मला खूप अफलातून प्रवास अनुभवयाला मिळाला. आजची रात्र एक खास रात्र होती कारण आम्ही एक टीम म्हणून एकत्र चित्रपट पाहिला. उद्याचा दिवस खास आहे कारण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ! चीफ @Atlee_dir यांचे खास आभार !’
सर्जनशील लेखक म्हणून सुमित ची ओळख ही सगळ्यांना माहीत आहे. पण जवान हा सुमित साठी एक कमालीचा अनुभव होता हे देखील तितकच खर आहे.
किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा ‘जवान’ आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित झाला. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. (Jawan Hindi Cinema) प्रदर्शनाच्या अगोदरच अॅडव्हान्स बुकिंगमधून या सिनेमाने लाखोंची कमाई केली आहे. (Jawan Leaked) सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.