पहिल्यांदा एकत्र दिसणार जॉनी अन् जेमी लिव्हर या बाप-लेकीची जोडी

पहिल्यांदा एकत्र दिसणार जॉनी अन् जेमी लिव्हर या बाप-लेकीची जोडी

Jonny Lever : विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि त्यांची मुलगी जेमी लिव्हर बाप-लेकीची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठीवरील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या विनोदवीराच्या येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहे. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे. ( Jonny and Jamie Lever pair of father-daughter for first time in Kon Honar Karodpati )

‘वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल’; अजितदादांना अर्थखातं देण्यावरुन गुलाबरावांचे मोठे विधान

त्याचबरोबर त्यांच्यासोबत व्ही आय पी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ते जिंकलेली रक्कम ते मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत. आता मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Gaurav More post: अमेरिकेमधील गौरव मोरेचा ‘तो’ Video व्हायरल

दरम्यान या कार्यक्रमात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्या. जॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाही. जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केली. त्यांच्या ह्या परफॉर्मवर सचिन खेडेकर आणि सगळेच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर जेमी लिव्हर हिने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवली. तिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केली. सचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube