Kalki 2898 AD: प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

Kalki 2898 AD: प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

Kalki 2898 AD OTT Streaming Price Right: प्रभास स्टारर (Prabhas) ‘कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा आहे. या मल्टीस्टारर सायन्स-फिक्शन चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि त्यानंतर रिलीजपूर्वीच्या कार्यक्रमाने ‘कल्की 2898 एडी’साठी (Kalki 2898 AD Movie) चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सर्वजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान चाहते’कल्की 2898 AD’ चे ओटीटी तपशील जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे आणि त्याचे हक्क किती विकले गेले चला तर मग जाणून घेऊया…

‘कल्की 2898 AD’ चे ओटीटी अधिकार किती किमतीला विकले गेले?

600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कल्की 2898 एडी’ या सायन्स फिक्शन चित्रपटाने डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकून बजेटच्या निम्म्याहून अधिक कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ चे ओटीटी हक्क एक नव्हे तर दोन स्ट्रीमिंग दिग्गजांनी सुरक्षित केले आहेत. नेटफ्लिक्सने चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे हक्क 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत, तर आणखी एका ओटीटी प्लॅटफॉर्मऍमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाच्या दक्षिण भाषेच्या हक्कांसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘कल्की 2898 AD ने एवढ्या मोठ्या स्ट्रीमिंग डीलसह एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.

‘कल्की 2898 एडी’ ओटीटी रिलीज डेट

या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट घोषित केलेली नाही. नियमांनुसार, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 8 आठवड्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो.

‘कल्की 2898 AD स्टार कास्ट

‘कल्की 2898 एडी’ हा एक पौराणिक साय-फाय चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभासने शिकारी भैरवची भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामा तर कमल हसन यांनी सुप्रीम यास्किनच्या रुपात खलनायकाची भूमिका साकारली आहे. दीपिका पदुकोण SUM-80 च्या भूमिकेत आहे तर दिशा पटानी रॉक्सीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात शाश्वत चॅटर्जी. ब्रह्मानंदम, पशुपती, कीर्ती सुरेश यांच्यासह अनेक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘कल्की 2898 एडी’ नाग अश्विन यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट वैजयंती मुव्हीज बॅनरखाली बनवण्यात आला आहे.

Kalki 2898 AD च्या इव्हेंटला दिपिकाची बेबी बंम्पमध्ये हजेरी; प्रभासने दिला हात; पाहा फोटो

‘कल्की 2898 एडी’ कधी रिलीज होणार?

27 जून रोजी ‘कल्की 2898 एडी’ पाच भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे. हा पॅन इंडिया चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषांसोबत तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे. कल्की 2898 एडी ची जबरदस्त आगाऊ बुकिंग झाली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत पहिल्याच दिवशी देशभरात 14 लाख 98 हजार 934 तिकिटांची प्री-विक्री केली आहे आणि यासह चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 40.91 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज