Katrina kaif : अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina kaif) गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून लांब होती. मात्र आता ती सलमान खानच्या आगामी टायगर 3 मध्ये दिसणार आहे. त्या दरम्यान आता नुकतचं एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये कॅटरिना दिसून आली. ही फक्त जाहिरातच नाही. तर हा ब्युटी ब्रॅंडचं तिचा आहे. कारण कॅटरीनाने सौंदर्य उद्योगात प्रवेश केला आहे. त्यात ती एक उद्योजिका आणि अभिनेत्री ही दुहेरी भूमिका ती सहजतेने साकारते आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, ‘तो’ आदेश रद्द करा
अभिनयाच्या सोबत ब्रँड सध्या जोरदार चर्चेत…
कॅटरीना कैफने (Katrina kaif) बिझनेस आयकॉन आणि ब्युटी इंडस्ट्रीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून पुन्हा एकदा तिची ओळख दाखवून दिली आहे. लिप ऑइल लाँच करून तिने तिच्या सौंदर्य ब्रँडमध्ये एक अजून नवीन गोष्ट केली आहे. अभिनयाच्या सोबतीने तिचा हा ब्रँड सध्या जोरदार चर्चेत आहे.
पंतप्रधान मोदींनी फोडाफोडीचंच राजकारण केलं; शरद पवारांचा घणाघात
के ब्युटी लिप ऑइल हे ग्लॅमर आणि स्किनकेअर साठी उत्तम आहे असं ती (Katrina kaif) सांगते. हलके फॉर्म्युला असलेले, ते ओठांना हायड्रेशन देणार हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच कमाल असणार यात शंका नाही. हे लिप ऑइल #MakeupThatKares च्या ब्रँड साठी अजून एक नवीन ओळख असणार आहे. तिची उत्कंठा व्यक्त करताना कैटरीना म्हणते. ‘मला हे उत्पादन सादर करताना खूप आनंद होत आहे, विशेषत: एक लिप ऑइल हा आमचा Kay products चा नवा भाग आहे.’
बॉलिवूड अभिनेता भाईजान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बहुचर्चित ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.भाईजान आणि कतरिना कैफच्या नव्या लूकने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
या वर्षीची दिवाळी बॉलिवुड प्रेमी साठी खास असणार आहे कारण सलमान खान आणि करिश्माई कतरिना कैफ (Katrina kaif) अभिनीत टायगर 3 च्या अत्यंत अपेक्षित रिलीझ डेट जाहीर झाली आहे. डायनॅमिक अभिनेत्री यशस्वी टायगर फ्रँचायझीच्या अॅक्शन-पॅक तिसर्या भागासह मोठ्या पडद्यावर परत येणार असून कारण तिने चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर केले आहे.रुपेरी पडद्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि जगभरातील चाहत्यांना चकित करण्यासाठी कैटरीना सज्ज झाली आहे.