Leonardo Dicaprio: स्पॉटलाईट अलर्ट! ‘टायटॅनिक’मधला जॅक पंजाबी मॉडेलच्या प्रेमात? चर्चेला उधाण

Leonardo Dicaprio: स्पॉटलाईट अलर्ट! ‘टायटॅनिक’मधला जॅक पंजाबी मॉडेलच्या प्रेमात? चर्चेला उधाण

Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) सध्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आता तो एका पंजाबी मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार रंगली आहे. नीलम गिल (Neelam Gill) असे या मॉडेलचे नाव आहे.

48 वर्षीय लियोनार्डोचं नाव 28 वर्षीय पंजाबी मॉडेल (Punjabi model) नीलम गिलसोबत जोडलं जात आहे. लंडनमधील चिल्टन फायरहाऊसमध्ये दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यावेळी नीलम गिलची आई देखील त्यांच्यासोबत होती. गेल्या काही दिवसांपासून लियानोर्डो आणि पंजाबी मॉडेल नीलम गिल ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023’मध्ये एकत्र दिसून आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)


नीलम गिल नेमकी कोण?
नीलम गिल ही ब्रिटिश पंजाबी मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अनेक हॉट फोटो शेअर करत नीलम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. निलमचा जन्म 27 एप्रिल 1995 रोजी लंडनमध्ये झाला आहे. 2014 पर्यंत ती लंडनमध्ये होती. नीलम गिलचं युट्यूब चॅनल देखील आहे. नैराश्य, सकारात्मकता अशा अनेक विषयांवर ती मोठ्या प्रमाणात भाष्य करत असते.

2013 साली नीलमने लंडन फॅशन वीकच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नीलम गिल एक उत्कृष्ट मॉडेल आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात तिने मोठी कामगिरी दर्शवली आहे. लियोनार्डोचं (Leonardo DiCaprio) नाव आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. कॅमिला मोरोनला तो डेट करत होता. यानंतर सुपरमॉडेल गिगी हदीदबरोबर तो रिलेशनमध्ये असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)


पंजाबी मॉडेल नीलम गिलला डेट करत असल्याचं सांगितले जात आहे. लियोनार्डो आणि मोरोन ४ वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण पुढे त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लियोनार्डो गिगी हदीदला डेट करू लागला होता. त्यानंतर टायटॅनिक अभिनेता 19 वर्षीय मॉडेल एडेन पोलानीला देखील डेट करू लागला.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

लियोनार्डो आज एक उत्कृष्ट अभिनेता आहे. ‘टायटॅनिक’ या सिनेमामुळे त्याला संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. ‘शटर आयलॅंड’ हा त्याचा सिनेमा चांगलाच लोकप्रिय झाला होता. लियोनार्डो आणि नीलमचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube