Lust Stories 2: शादिसे पहिले नो टेस्ट ड्राईव्ह?, ‘लस्ट स्टोरीज-2’ चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Lust Stories 2: शादिसे पहिले नो टेस्ट ड्राईव्ह?, ‘लस्ट स्टोरीज-2’ चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Lust Stories 2 Trailer Release: ओटीटीवरील सिनेमे आणि वेब सीरिजला चाहत्यांची पसंती मिळत असते. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील आधारित सिनेमा आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज (Lust Stories) या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. या सिनेमात चार गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


या सिनेमातील ४ कथा जोया अख्तर (Zoya Akhtar), करण जोहर (Karan Johar), अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) या ४ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले  आहे. आता लवकरच लस्ट स्टोरीजचा भाग दुसरा रिलीज होणार आहे. ‘लस्ट स्टोरीज-2’ चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. लस्ट स्टोरीज-2 च्या ट्रेलरमधील हटके डायलॉग्सनं अनेकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.

या ट्रेलरमध्ये अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया या कलाकारांचा रोमँटिक अंदाज दिसून येणार आहे. आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या ४ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या सिनेमात दाखवण्यात आली आहे. लस्ट स्टोरीज-2 मध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्याबरोबर काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

गेल्या काही दिवसांपूर्वी लस्ट स्टोरीज-2 चा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या टीझरमधील डायलॉगने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता लस्ट स्टोरीज-2 च्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तमन्ना आणि विजय हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, असंही सांगितले जात आहे. आता या दोघांची केमिस्ट्री लस्ट स्टोरीज-2 मध्ये बघण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजय वर्माबद्दलच्या नात्याविषयी बोलताना तमन्ना म्हणाली की,”माझं आणि विजयचं नातं खूप खास आहे. भारतात जोडीदारासाठी काही गोष्टी बदलाव्या लागत असतात. पण विजयने मला मी जशी आहे तसं स्वीकारलं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदाचं कारण झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube