Maharaj: आमिरच्या लेकाचा ‘महाराज’ ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

Maharaj: आमिरच्या लेकाचा ‘महाराज’ ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल

Maharaj OTT Release Date: प्रत्येकजण आमिर खानचा (Aamir Khan) लेक जुनेद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांपासून तो त्याच्या अभिनय कारकिर्दीची तयारी करत होता. जुनैद खान त्याच्या आगामी ‘महाराज’ (Maharaj Movie) चित्रपटात जयदीप अहलावतसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​दिग्दर्शित, हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित न होता थेट ओटीटी (OTT प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहे. ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या घर बसल्या आरामात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


‘महाराज’ओटीटी प्रकाशन तारीख

चित्रपटाचा अभिनेता जयदीप अहलावतने इन्स्टाग्रामवर याची पुष्टी केली की, महाराज हा चित्रपट 14 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराजा बदनामी प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाची कथा पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुळजी यांच्यावर आधारित आहे. करसनदास मुळजी यांनी त्या काळात महिलांचे हक्क आणि सामाजिक सुधारणेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

‘महाराज’ कुठे रिलीज होणार

ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर महाराजांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जुनैदच्या डिजिटल डेब्यूची बातमी देखील दिली होती. मजेशीर पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘एक शक्तिशाली माणूस आणि निर्भय पत्रकार यांच्यातील सत्यासाठी लढा. 1860 च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित – महाराज 14 जून रोजी फक्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

Netflix ची धमाकेदार घोषणा! 8 चित्रपट आणि 14 सीरिज करणार प्रदर्शित

‘महाराज’ स्टारकास्ट

‘महाराज’मध्ये जुनैद खान आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विपुल मेहता, स्नेहा देसा, शालिनी पांडे आणि शर्वरी या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. यशराज फिल्म्स एंटरटेनमेंट (YRF) च्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज