Sonalee Kulkarni: अप्सरेनं भारताबाहेर चक्क साडी नेसून केलं फोटोशूट
प्रेरणा जंगम
Sonalee Kulkarni: सेलिब्रिटी मंडळी हे फोटोशूटच्या माध्यमातून विविध प्रयोग करताना दिसतात. विविध प्रकारचे कपडे परिधान करुन हटके फोटोशूट करण्याची फॅशन (Fashion) आहे. यातच महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तर एकापेक्षा एक फोटोशूट करत असल्याचे दिसून येत आहे. (Social media) तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर निरनिराळे फोटो पाहायला मिळतात. मात्र तिने नुकतेच शेयर केलेले फोटो सध्या (Photo Viral) चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही खास आहे.
View this post on Instagram
सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते. नुकतच तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिने तुर्की येथे खास ट्रीप केली आहे. पती कुणाला बेनोडेकरसोबत ती तुर्कीमध्ये खास वेकेशन एन्जॉय करत आहे. तुर्कीमध्ये कॅपाडोसिया हे ठिकाण हॉट एयर बलून राईडसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी सुंदर दृश्यांसह सोनालीने तिचं छान फोटोशूट करुन घेतल आहे. जिथे सोनालीच्या मागे असंख्य हॉट एयर बलून पाहायला मिळत आहेत. ही सुंदर दृश्ये आणि त्यासोबत सोनालीचा हटके लुक लक्ष वेधून घेत आहे.
एवढचं नाही तर सोनालीने या फोटोशूटमध्ये चक्क सुंदर साडी नेसली आहे. भारताबाहेर असं साडी नेसून केलेलं सोनालीचं हे फोटोशूट लक्षवेधी ठरत आहे. सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनाही हे फोटोशूट प्रचंड आवडले आहे. गुलाबी ब्लाऊज आणि त्यावर आकाशी रंगाची सुंदर साडी असा हा सोनालीचा लुक आहे.
View this post on Instagram
याशिवाय तुर्कीमधील इतर ठिकाणी देखील सोनालीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. तुर्कीमधील लव्ह व्हॅली येथील फोटोमध्येही सोनालीचा ग्लॅमरस हॅट लुक पाहायला मिळत असतो. तर तुर्कीमधील इतर ठिकाणचे तिचे फोटोही तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. तुर्की येथे टर्किश आईस्क्रिम प्रचंड प्रसिद्ध आहे. ही आईस्क्रिम सर्व्ह करण्याची एक विशिष्ट मजेशीर पद्धत आहे. तर सोनालीने या आईस्क्रिमचाही आस्वाद घेतला आहे.
Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात
एकूणच सोनालीने या निमित्ताने तुर्कीची सुंदर सफर केली आहे. शिवाय सोशल मिडीयावर या खास ट्रीपचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करून तिने चाहत्यांनाही या सुंदर ठिकाणची झलक दाखवली आहे. सोनालीसाठी ही सफर स्पेशल ठरली असणार एवढं नक्की…