Aatur: ‘मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा; ‘आतुर’ सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Aatur: ‘मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा; ‘आतुर’ सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Aatur Teaser Release: सध्या मराठी अनेक वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनत आहेत. अनेक प्रयोग होत आहेत. डार्क कॉमेडी, महिलांवर आधारित सिनेमा, गंभीर, हॉरर असे सर्वच विषय समोर येत आहेत. (Social Media) राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी ‘आतुर’ (Aatur Marathi Movie) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथेबद्दल मांडण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AATUR Marathi Film (@aatur_marathi_film)


‘आतुर’ या सिनेमात अभिनेत्री प्रिती मल्लापुरकरने (Priti Mallapurkar) मुख्य भूमिका साकारली आहे. टीझरमधून असे पाहायला मिळत आहे की, सिनेमाची कथा तिच्याच आयुष्याभोवती फिरते. सामान्य गृहिणी असणारी महिला जिला आई होण्याची इच्छा आहे, परंतु तिला मूल होत नाही. तसेच तिचे पती आणि डॉक्टर तिला कसं सावरुन घेत असतात हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. सध्या या सिनेमाचा टीझर आला असून ट्रेलरमध्ये गोष्ट आणखी जास्त स्पष्ट होणार असल्याचे बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Shashikant Jadhav (@kiransjadhavofficial)


भावूक विषयावर हा सिनेमा आधारित आहे. यामुळे अभिनयाची कसोटीच आहे. प्रिती मल्लापुरकरने यामध्ये ती महिला साकारली आहे. तर योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर मुख्य डॉक्टरच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. शिवाजी लोटन पाटील यांची शैली, विषय हाताळण्याची पद्धत आणि चाहत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवणारं ताकदीचं सादरीकरण या गोष्टींमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी कलाकृती ही अपेक्षांची पूरेपूर पूर्तता करणारी असेल याबाबत सगळ्यांनाच खात्री असणार आहे.

Naal 2: “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा नाळ 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘आतुर’ या आगामी सिनेमात अभिनेत्री प्रिती मल्लापुरकर ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. झेनिथ प्रोडक्शनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी तर कथा-पटकथा तेजस परसपाटकी, आनंद निकम व किरण जाधव यांनी लिहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube