सातासमुद्रापार मराठीचा डंका; ‘मी वसंतराव’ ऑस्करच्या शर्यतीत
मुंबई : द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली.
या यादीत २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची माहिती समोर आलीये ती म्हणजे ‘मी वसंतराव’ या मराठी सिनेमाचाही 301 सिनेमांच्या रिमांइंडर यादीत समावेश झाला आहे.
ऑस्कर २०२३ च्या यादीत द काश्मीर फाईल्स, आर.आर.आर, कांतारा, गंगूबाई काठियावाडी आणि रॉकेट्री – द नंबी इफेक्ट हा चित्रपटासोबतच राहुल देशपांडे अभिनित ‘मी वसंतराव’ चित्रपटाचाही समावेश झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक, संगीतकार आणि अभिनेता राहुल देशपांडे यानं पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘मी वसंतराव’ या मराठी सिनेमाचा समावेश ऑस्करच्या लिस्टमध्ये झाल्याचा मला मनापासून आनंद आहे अशी प्रतिक्रिया गायक राहुल देशपांडे यांनं दिली आहे.
राहुलनं आनंद व्यक्त करत म्हटलंय, ‘ऑस्करच्या रिमांइंडर यादीच्या निमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो’.
मी वसंतराव या सिनेमात गायक राहुल देशपांडे यानं वसंतराव देशपांडे यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते, कुमुदिनी वालोकर, अमेय वाघ हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. राहुल देशपांडे याला सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.