एमआयएफएफ हे युवा चित्रपट निर्मात्यांसाठी मोठे व्यासपीठ; फ्रेंच दिग्दर्शिका फायेझे करिमपूर यांचे मत
MIFF a big opportunity 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF 2026) जगभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेला विशेष व्यासपीठ मिळाले.
MIFF a big opportunity for young filmmakers, says French director Faeze Karimpour : 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF 2026) जगभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेला विशेष व्यासपीठ मिळाले. महोत्सवातील “इमर्जिंग व्हॉइसेस : फिल्म स्कूल एडिशन्स” या विभागात फ्रान्समधील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट संस्था ला फेमिसच्या सात चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. या माध्यमातून प्रेक्षकांना फ्रेंच चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीच्या सर्जनशीलतेची आणि कलात्मक दृष्टीची झलक पाहायला मिळाली.
राज्याचे प्रमुखपद मिळवलं पण उद्धव ठाकरेंनी सहा वर्षात सेना संपवली का ?
17 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमध्ये विविध विषय, नावीन्यपूर्ण मांडणी आणि उच्च दर्जाची कलात्मकता अनुभवायला मिळाली. त्यापैकी फायेझे करिमपूर दिग्दर्शित आठ मिनिटांचा ‘द अवेकनिंग’ हा लघुपट विशेष लक्षवेधी ठरला. वार्षिक कार्यक्रमासाठी रंगमंचावर जाण्याच्या तयारीत असलेल्या एका मुलाची भीती, त्यानंतर घडणारे प्रसंग आणि आत्मविश्वास पुनर्प्राप्त करण्याचा त्याचा प्रवास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब?; 20 जूनला सहा खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता
या प्रदर्शनावेळी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) कलात्मक संचालक पंकज सक्सेना यांच्या हस्ते फायेझे करिमपूर यांचा सत्कार करण्यात आला. तेहरानमध्ये व्हिज्युअल आर्ट्सचे शिक्षण घेतल्यानंतर फ्रान्समध्ये चित्रपट अभ्यास करणाऱ्या करिमपूर यांनी सांगितले की, एमआयएफएफसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपट प्रदर्शित होणे हे युवा चित्रपट निर्मात्यांसाठी मोठी संधी आहे. याशिवाय तमारा विटोझ दिग्दर्शित ‘बोल कट’, एमिलियन पिशॉन यांचा अॅनिमेशनपट ‘मॅक्स’, तसेच लिली बेलबेझ यांचा ‘माय इंटरनेट कंट्रीसाइड’ यांसारख्या चित्रपटांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
एआय सर्जनशीलतेचे भवितव्य? 19 व्या मिफ्फमध्ये चित्रपटात एआयचा जबाबदारीने वापर करण्यावर भर
टॉमी बुले आणि व्हॅलेंटिन नोएल दिग्दर्शित ‘नॉट टू डाय अलोन’ या चित्रपटात ओळख आणि सामाजिक संस्कारांचा वेध घेण्यात आला आहे. तर माऊड व्हिलेझ यांच्या ‘साइन्स फ्रॉम बिलो’ या अॅनिमेशन डॉक्युमेंटरीत बहिऱ्या व्यक्तीच्या अनुभवविश्वाचे संवेदनशील चित्रण करण्यात आले आहे. ज्युलिएट गॉडिन यांच्या ‘स्टिल वॉटर्स’ या चित्रपटात परिचारिका ल्युसिलच्या आयुष्यातील भावनिक आणि व्यावसायिक संघर्ष दाखवण्यात आले आहेत.
या चित्रपट प्रदर्शनाला चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फ्रान्समधील युवा चित्रपट निर्मात्यांच्या सहभागामुळे भारतीय चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि प्रेक्षक यांच्यात विचारांची देवाणघेवाण घडून आली आणि महोत्सवाला आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले.