अजय देवगणच्या ‘दृश्यम द कन्क्लूजन’वर मोहनलाल फिदा; संपूर्ण टीमसाठी दिला खास संदेश!

Drishyam The Conclusion या चित्रपटाच्या कौतुकात मल्याळम सुपरस्टार आणि ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा प्रमुख चेहरा मोहनलाल यांचीही भर पडली आहे.

Drishyam The Conclusion

Mohanlal impressed by Ajay Devgn’s ‘Drishyam The Conclusion’ shares a special message for the entire team : बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असलेला अजय देवगणचा ‘दृश्यम द कन्क्लूजन’ हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. चित्रपटाच्या कमाईची सर्वत्र चर्चा सुरू असून, सोशल मीडियावर मीम्स, चाहत्यांचे अंदाज आणि चित्रपटाच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता या चित्रपटाच्या कौतुकात मल्याळम सुपरस्टार आणि ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा प्रमुख चेहरा मोहनलाल यांचीही भर पडली आहे.

दमदार कलाकारांची फौज उलगडवणार रहस्याच्या सावलीत ‘खग्रास’ची गोष्ट! चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित

मोहनलाल यांनी ‘दृश्यम द कन्क्लूजन’ या हिंदी चित्रपटाची आवृत्ती पाहिली असून, चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी खास संदेश शेअर केला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे कौतुक करत त्यांनी दिग्दर्शक अभिषेक पाठक, कुमार मंगत पाठक आणि अजय देवगण यांच्यासह संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Studio18 (@starstudio18)

राज्य सरकारला MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही मग चौकशी कशी? विजय कुंभारांनी सांगितला कायदेशीर पेच

मोहनलाल यांनी आपल्या संदेशात म्हटले, “मी ‘दृश्यम द कन्क्लूजन’ पाहिला आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या या प्रवासाचा योग्य शेवट ज्या पद्धतीने करण्यात आला आहे, त्याने मी खरोखर प्रभावित झालो आहे. अभिषेक पाठक, कुमार मंगत पाठक, अजय देवगण आणि संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञांच्या टीमचे उत्तम कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.”

दिल्लीत सकाळी-सकाळी सीजेपीचे निदर्शने! रांका, दाससह कार्यकर्ते ताब्यात; मोदींना टॅग करत दिपके म्हणाले…

अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. लोकप्रिय ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा हा अंतिम भाग असल्याने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा मात्र ‘त्या’ मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक होणार?

स्टार स्टुडिओ18 प्रस्तुत आणि पॅनोरमा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. अभिषेक पाठक, आमिल कीयान खान आणि परवीज शेख यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘दृश्यम द कन्क्लूजन’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

follow us