संगीत क्षेत्रावर शोककळा, नंदू घाणेकर कालवश

Untitled Design (84)

मुंबई : ताऱ्यांच बेट यांसह अनेक चित्रपटांचे संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालं. ते गिरीश घाणेकर व डॉक्टर शुभा थत्ते यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी लता मंगेशकर यांची दोन अध्यात्मिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्याची सिडी कुठेही आली नाही. हा खजिना त्यांच्या संग्रही होता. ही लता मंगेशकर यांची दोन अप्रकाशित गाणी. नंदू यांचे संगीत असलेले सुनंदा, शाली असे आणखी दोन चित्रपट असावेत.

त्यांचे वडील गोविंद घाणेकर हेही फिल्म दुनियेत सक्रिय होते. गोविंदराव यांचे नाव जास्त जाहिरात क्षेत्रात प्रसिद्ध होते. घाणेकर कुटुंब पूर्वी दादर पूर्व येथील स्वामी नारायण मंदिरराच्या समोरील पाम व्ह्यू इमारतीत तळमजल्यावर राहात असतं. हे कुटुंब ज्या फ्लॅटमध्ये राहत असे तिथे त्याआधी रुईयाचे बॉईज हॉस्टेल होते. तिथे लेखक बाळ सामंत हे विद्यार्थीदशेत असताना राहात असतं.

या फ्लॅटमध्ये १९५०च्या दशकात सामंत व इतर विद्यार्थ्यांनी बालगंधर्व यांच्या मैफिली आयोजित केल्या होत्या. असा संदर्भ ‘तो राजहंस एक’ या सामंत यांच्या पुस्तकात येतो. म्हणजे संगीत, चित्रपट यांच्याच संगतीची पार्श्वभूमी असलेल्या वास्तूत नंतर नंदू घाणेकर मोठे झाले होते. काही वर्षांपूर्वी ते दादर सोडून ठाण्यात राहायला गेले होते. भारतीय व पश्चिमात्य संगीतावर जीवापाड प्रेम करणारे संगीतकार कालवश झाले आहेत.

Tags

follow us