Video: बिग बी यांची नात ‘गली बॉय’ सिद्धांत चतुर्वेदीला करतेय डेट? Video Viral…

Video: बिग बी यांची नात ‘गली बॉय’ सिद्धांत चतुर्वेदीला करतेय डेट? Video Viral…

Navya Bachchan Video Viral: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी (Big B) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda ) ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याची चर्चा खूप दिवसांपासून जोरदार सुरू आहे. तसेच या दोघांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


त्या व्हिडिओमध्ये दोघेही विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत. रविवारी नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी व्हेकेशनवरून परतले असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ट्विनिंग केले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये नव्या पांढरा टॉप आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे तर सिद्धांत पांढऱ्या टी-शर्टमध्ये मॅचिंग पँट आणि कॅपमध्ये दिसत आहे. आणि त्याने तोंडावर मास्कही लावला असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असताना दोघे एकमेकांशी गप्पा मारत दिसून आले आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा यांच्या डेटिंगच्या अफवा एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या कमेंट्सनंतर सुरू झाल्या आहेत. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील ते एकत्र नाचताना दिसून आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिनेमा निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतून हे दोघेही एकत्र बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

यावेळी ते सार्वजनिकरित्या पहिल्यांदा एकत्र दिसले होते. बिग बी यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या ही एक उद्योजिका आहे. तर, सिद्धांतने ‘गली बॉय’, ‘गेहराईयां’, ‘बंटी और बबली २’ आणि ‘फोन भूत’ यांसारख्या सिनेमामध्ये काम केले आहे. दरम्यान फोन भूतच्या प्रमोशनच्या दरम्यान देखील सिद्धांतला नव्याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तेव्हा ‘मी कुणाला तरी डेट करतोय या चर्चा खऱ्या आहेत, असं मी म्हणू शकतो असतो तर बरं झालं असतं,’ असं तो म्हणाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube