“तिघी” झी 5 मराठीवर प्रदर्शित झाला आणि या निमित्तानं अभिनेत्री नेहा पेंडसे हिने तिच्या खास भावना व्यक्त केल्या

तिघी हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर आकार घेत गेला त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रवासाचा भाग होणं खूप खास होतं.

  • Written By: Published:
Untitled Design 25 1

Neha Pendse expressed her special feelings : तिघी हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर आकार घेत गेला त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रवासाचा भाग होणं खूप खास होतं. चित्रपटाची संकल्पना, व्यक्तिरेखा आणि त्यामागची भावनिक प्रामाणिकता मला सुरुवातीपासूनच खूप भावली. प्रत्येक दिवसागणिक आम्हाला जाणवत होतं की आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. त्यामुळे या चित्रपटातून काहीतरी सुंदर घडणार याची खात्री आम्हा सगळ्यांनाच होती.

तिघी ला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. असा कोणता प्रतिसाद किंवा प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती जी विशेष भावली?

तिघी हा चित्रपट विशेषतः महिलांशी खूप खोलवर जाऊन जोडणारा आहे. अनेक महिलांनी चित्रपट पाहिल्यानंतर आमच्याजवळ येऊन त्यांच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले. काहींच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहींनी आम्हाला मिठी मारत “ही गोष्ट माझ्यासोबतही घडली आहे” असं सांगितलं. प्रेक्षकांनी चित्रपटावर ठेवलेला हा विश्वास आणि भावनिक नातं आमच्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी होतं. या प्रवासातून चांगल्या सिनेमाची ताकद आणि भावनांमधून निर्माण होणारं नातं किती प्रभावी असतं, हे आम्हाला पुन्हा जाणवलं.

आता तिघी ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. थिएटरच्या पलीकडे ही कथा अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा आनंद वाटतोय का?

नक्कीच. प्रत्येकाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे त्या चित्रपटाला मिळालेलं दुसरं आयुष्य असतं. प्रेक्षक त्यांच्या वेळेनुसार आणि योग्य मनःस्थितीत हा चित्रपट पाहू शकतात, ही OTT ची सर्वात मोठी ताकद आहे. आम्ही Marathi ZEE5 चे मनापासून आभारी आहोत की तिघी आता आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणार आहे. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यापर्यंत आता ही कथा नक्की पोहोचेल याचा आनंद आहे.

मराठी सिनेमा नेहमीच भावनिक प्रामाणिकतेसाठी ओळखला जातो. तिघी ला इतर भाषा आणि प्रदेशांमधूनही प्रतिसाद मिळाला का?

तिघी bची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हा चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांपुरता मर्यादित राहिला नाही. उत्तम word of mouth मुळे अनेक non-Marathi प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहिला आणि त्याच्याशी जोडले गेले. भाषेच्या पलीकडे जाऊन चांगल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात, याचा अनुभव Tighee मुळे आम्हाला आला. त्यामुळे OTT वरदेखील विविध भाषिक प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून पाहतील, अशी आम्हाला खात्री आहे.

डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

मागे वळून पाहताना तिघीच्या प्रवासातील अशी कोणती आठवण आहे जी कायम तुझा सोबत राहील?

तिघी ने मला फक्त एक चित्रपट दिला नाही, तर आयुष्यभर जपावीत अशी नाती दिली. शूटिंग संपल्यानंतरही आज अनेक कलाकार आणि टीममधील लोकांशी माझं अतिशय जवळचं नातं कायम आहे. यापूर्वी कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मला असा अनुभव आला नव्हता. त्यामुळे तिघी माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर खूप खास भावनिक प्रवास आहे.

प्रत्येक चित्रपट कलाकाराला काहीतरी देऊन जातो तिघी ने वैयक्तिक आयुष्यात काय दिलं?

चित्रपटाच्या च्या प्रवासात आम्ही आमच्या स्वतःच्या आयुष्यातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकलो. या चित्रपटामुळे मला काही ताणलेली नाती समजून घेण्याची आणि त्यांना पुन्हा जपण्याची प्रेरणा मिळाली. पडद्यावर आम्ही ज्या भावना मांडत होतो, त्या प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवण्याची आणि स्वीकारण्याची संधी चित्रपटाने दिली. वैयक्तिक पातळीवर हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि समाधान देणारा ठरला.

follow us