Nitin Desai: अवघ्या 20 तासांत सजवला होता ठाकरेंच्या शपथविधीचा मंच; नितीन देसाईंच्या विलक्षण कलाकृतीने भारावले होते शिवसैनिक

Nitin Desai: अवघ्या 20 तासांत सजवला होता ठाकरेंच्या शपथविधीचा मंच; नितीन देसाईंच्या विलक्षण कलाकृतीने भारावले होते शिवसैनिक

Nitin Chandrakant Desai death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी आपली जीवन संपवलं आहे. (Nitin Desai) देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या आत्महत्येचं कारण देखील अखेर समोर आले आहे. आर्थिक विवंचनातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ( Nitin Chandrakant Desai death)

Nitin Desai: अडीचशे कोटींच्या कर्जाचा डोंगर अन् स्टुडिओ जप्तीची भीती? नितीन देसाई होते आर्थिक विवंचनेत

नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे  चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांनी अवघ्या २० तासामध्ये संपूर्ण मंच उभा केला होता. मुंबईमधील शिवाजी पार्कात हा भव्य मंच उभारण्यात आला होता. शपथविधीच्या कार्यक्रमाच्या वेळेस अनेकांनी त्यांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केल्याचे बघायला मिळाले होते.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई

या कार्यक्रमात सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांची विशालकाय मूर्ती. ही संपूर्ण व्यवस्था नितीन देसाई यांनी अवघ्या २० तासामध्ये केल्याचे बघायला मिळालं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकरिता सेट डिझाइन करायचा होता. आणि अचानक आमची बैठक झाली. त्यानंतर मी त्यांच्या समोर बसूनच संपूर्ण मॉडेल तयार करून घेतला. हा मॉडेल शिवसैनिकांना खूप आवडला आणि त्यानंतर आम्ही काम सुरू केलं”, असं त्यांनी त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

या मॉडेलचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले होते. आमच्याकडे तयारीसाठी फक्त २० तास असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण होता. त्या कार्यक्रमासाठी आम्हीही मोठ्या उत्साहाने काम केले होते. उद्धव ठाकरे हे स्वत: देखील एक आर्टिस्ट आहेत. याअगोदर मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले होते.

यामुळे त्यांच्या आवड- निवड या सर्व गोष्टी ठाऊक होत्या. त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच शपथविधीचा सेट डिझाइन केल्याचे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी साधारण ६० हजार शिवसैनिक बसण्याची व्यवस्था नितीन देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्या कार्यक्रमाला जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube