Nivedita Saraf : ‘त्यांनी सगळ्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे…’, निवेदिता सराफ यांना आला राग
Nivedita Saraf: सेलिब्रिटी मंडळी शूटींग व्यतिरिक्त कुढे बाहेर जातात, तेव्हा त्यांना विविध अनुभवांना सामोरं जावं लागतं. कधी चाहत्यांचा गराडा तर कधी चाहत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. मात्र नुकत्याच एका अभिनेत्रीला आलेला विचित्र अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर (Social media) शेयर केला आहे. या अभिनेत्री म्हणजे निवेदित सराफ (Nivedita Saraf). नुकतच खरेदी करताना त्यांना आलेला अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर सांगितला आहे.
View this post on Instagram
त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. निवेदिता सराफ नुकत्याच एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र खरेदीच्या दरम्यान त्यांना वाईट अनुभव आला. मॉलच्या स्टाफने दिलेली चूकीची वागणूक त्यांना खटकली. याविषयी खंत व्यक्त करत त्यांनी नेमकी घटणा पोस्टमध्ये लिहिली आहे. त्यांनी लिहिणे आहे की, “नमस्कार मी ‘इन्फिनिटी २’ मालाडमधील मॅक्स स्टोअरमध्ये गेले होते. तिथे असणाऱ्या समोरच्याशी बोलायलाही तयार नसणाऱ्या कर्मचार्यांचा मला खूप वाईट अनुभव आला. तुम्ही काही खरेदी केलं की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते.
एक मुलगी बाहेर आली आणि तिने तिथे कामाला असणाऱ्या दुसऱ्या मुलीला सांगितलं की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली. जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखलं की मी कोण आहे. तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला बोलावलं. मला चांगली वागणूक यासाठी नको होती. कारण की मी एक ओळखीचा चेहरा आहे, पण मला एक सामान्य ग्राहक म्हणून चांगली वागणूक हवी होती. मी त्यासाठी पात्र आहे आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील त्याला पात्र आहे. त्यांनी सगळ्यांना चांगली वागणूक दिलीच पाहिजे.
Kushal Badrike: ‘माहितीये रे बाबा तुझं प्रेम आहे बायकोवर…’, कुशलच्या पोस्टवर भन्नाट कमेंट्स
निवेदिता सराफ या अनेक वर्षांपासून अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेत. चित्रपट, मालिकांमधील विविध भूमिकांसाठी प्रेक्षकांनी त्यांना मोठी पसंती दिली आहे. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तू मला या मालिकेत त्या महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. खरेदी करताना मॉलमध्ये एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर सामान्य ग्राहक म्हणून प्रत्येकाला चांगली वागणून मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.