मराठमोळा अभिनेता पार्थ भालेरावचं ‘हम दोनो और सूट’ नाटकातून दिग्दर्शनात पदार्पण

मराठमोळा अभिनेता पार्थ भालेरावचं ‘हम दोनो और सूट’ नाटकातून दिग्दर्शनात पदार्पण

Parth Bhalerao Upcoming Natak: मराठमोळा अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. लवरकच तो ‘हम दोनो और सूट’ (Hum Dono Aur Suit) नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. (Marathi Natak) केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao)


दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो की, ” मला ही कथा प्रचंड भावली. 1970च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे.

पहिला प्रयोग 13 जानेवारीला: नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग 13 जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे 9 वाजता होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात ‘प्रभू श्रीराम’ गाणं

पाच व्यक्तिरेखा असणार: रितिका श्रोत्री म्हणते, ”यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना 1 तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या