Patthe Bapurao Movie : प्रसाद ओक साकारणार ‘पठ्ठे बापूराव’; लोकशाहीराचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
Patthe Bapurao Movie : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र (Patthe Bapurao)आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहू्र्तावर या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो स्वतःच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. प्रसाद ओकने याआधी ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
Dil Dosti Deewanagi: ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर
प्रसाद ओक आता लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. या चित्रपटात त्याच्यासह अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी या आगामी चित्रपटाचे पोस्टरचे सोशल मीडियावर अनावरण करण्यात आले. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती.. आशीर्वाद असू द्या मायबापहो.. नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेलं अजराम नाव कलारत्न पठ्ठे बापूराव. असे प्रसाद ओकने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे.
स्वरुप स्टुडिओज् निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे, सपना लालचंदानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले आहे. संजय मेमाणे यांचे छायांकन आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे सांगण्यात आले.
Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ठरला एक एपिक पेज- टर्नर