Poojappura Ravi Passed Away : मल्याळम अभिनेते पूजापुरा रवी यांचे निधन; 800 पेक्षा जास्त सिनेमांत केलंय काम

  • Written By: Published:
Poojappura Ravi Passed Away

Poojappura Ravi Passed Away : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पूजापुरा रवी (Poojappura Ravi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतूनही शोक व्यक्त केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rarish G (@g.rarish)


पूजापुरा रवी यांनी ८०० हून जास्त चित्रपटात काम केलं आहे. ‘गप्पी’ या चित्रपटामध्ये ते शेवटचे झळकले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी मल्याळम अभिनेते टोविनो थॉमस यांच्याबरोबर काम केले होते. दिवंगत एन.के. आचार्य यांच्या नाटकाच्या माध्यमातून पूजापुरा रवी यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. मल्याळम रंगभूमीवरील ते लोकप्रिय अभिनेते होते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची मोठी जादू दाखवली होती.

पूजापुरा रवी यांनी ४ हजारहून जास्त नाटकांत आणि ८०० हून अधिक सिनेमामध्ये काम केले आहे. कल्पन कपैल थन्ने, राउडी रामू, ओर्माकल मरिक्कुमो, मुथरमकुन्नु पीओ, पूचक्कोरू मुक्कुथी, माझा पय्युन्नु मद्दलम कोट्टुन्नु आणि कदथनदान अंबाडी हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले होते. अनेक सिरीयलमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

पूजापुरा रवी यांच्या निधनाविषयी सिनेविश्वातील मंडळींसह राजकीय क्षेत्रातील मंडळींनी देखील शोक व्यक्त केला आहे. पूजापुरा रवी यांचा दक्षिणेत मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या या निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन, उच्च शिक्षण मंत्री डॉ. आर बिंदू आणि माजी मंत्री केके सेलजा आणि जी सुधाकरन यांनीही रवी यांच्या निधनाबद्दल मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला आहे.

Tags

follow us