K Pop Singer Haesoo : के-पॉप सिंगर हसूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T115459.878

K Pop Singer Haesoo: कोरियन के–पॉप बँडच्या चाहत्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. के-पॉप स्टार गायक मूनबिन याने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपवले होते. ही घटना ताजी असतानाच आता के-पॉप स्टार तसेच प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका हॉटेलमध्ये हेसूचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. तिच्या या निधनामुळे जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध कोरियन गायिका हेसूचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परंतु ती या कार्यक्रमासाठी आली नव्हती. यानंतर आयोजिकांनी ती हरवल्याची तक्रार दाखल पोलिसांकडे केली.

Vaibhav Mangale : कुणी कुठे कशी दाद मागावी? नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर वैभव मांगले भडकले

यानंतर पोलिसांची तपास केला असता शनिवारी १३ मे रोजी हेसूचा मृतदेह एका हॉटेलच्या रुममध्ये आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us