देविका दफ्तरदार भावस्पर्शी भूमिका असलेल्या “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच!

Poster launch of film Sahal या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री देविका दफ्तरदारची भावस्पर्शी भूमिका पहायला मिळणार आहे.

Poster Launch Of Film Sahal

Poster launch of film Sahal featuring a poignant performance by Devika Daftardar : मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सहल’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांची भावस्पर्शी भूमिका पहायला मिळणार आहे. ९ ऑक्टोबरला ‘सहल’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा

के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर असून, सहनिर्माते मुकुंद वसंत खुपेरकर आहेत. मूळ पटकथा मुकुंद वसंत खुपेरकर यांनी लिहिली आहे. ‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर आणि सागर कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय

सिद्धेश मुकुंद खुपेरकर याचे या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य नायक म्हणून पदार्पण असून त्याने याआधी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका “तुझ्यात जीव रंगला” ह्यामध्ये लहान राणाच्या भावाची म्हणजेच सुरजची भुमिका साकारली होती, तसेच डॉ केशव हेगडेवार ह्यांची बाल भुमिका ही साकारली होती.चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यानी केले असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे. सुहास मुंढे, समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याच्या आवाजात चित्रपटातील गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे. मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता, श्रेय चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन तर प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी मिळणार रिचार्ज; TRAIचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश

देविका दफ्तरदार यांनी अनेक चित्रपटांतून अत्यंत संवेदनशील भूमिका साकारून त्यांच्यातील सक्षम अभिनेत्रीचं दर्शन घडवलं आहे. आता सहल या चित्रपटातील ‘आई’ या भूमिकेतून देविका दफ्तरदार नेमके कोणते भावविश्व उभे करतात आणि चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांशी त्यांचे नाते कसे उलगडत जाते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. देविका दफ्तरदार यांच्या अभिनयाची ताकद आणि संवेदनशील व्यक्तिरेखा यामुळे ‘सहल’ लक्षवेधी ठरत आहे. ९ ऑक्टोबरपासून ‘सहल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us