वैभव चिंचाळकर दिग्दर्शित “कप बशी” 5 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कप बशी’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनला महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

  • Written By: Published:
Untitled Design (37)

Poster of the film ‘Kap Bashi’ launched on social media : सासूृृ-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता “कप-बशी” या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने “कप बशी” या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे,आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे यात शंका नाही.

अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचं नाव घेत रुपाली ठोंबरेंनी केली मोठी मागणी

गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे. अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु ​अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सूनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत.

त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचे पुढे लग्न जुळत की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर “कप बशी” हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असल्यानं प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन अनुभवायला मिळेल त्यासाठी 5 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us