Prasad and Shreya मध्ये रंगणार विनोदाची जुगलबंदी; ‘या’ मंचावर येणार एकत्र

Prasad and Shreya मध्ये रंगणार विनोदाची जुगलबंदी; ‘या’ मंचावर येणार एकत्र

Prasad and Shreya : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (Shyreya Bugade) हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत.

Government Schemes : ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेचा (पोखरा अंतर्गत) लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

हा दिमाखदार पुरस्कार सोहळा 30 नोव्हेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. पहिल्यांदाच एकत्र सूत्रसंचलन करण्याचा आनंद या दोघांनीही व्यक्त केला. या दोन्ही कलाकारांचा हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व याद्वारे अचूक टायमिंग साधणारे प्रसाद आणि श्रेया सूत्रसंचलनाची बॅटिंग ही दमदार करतील हे वेगळं सांगायला नको.

Narhari Zirval & Chhagan Bhujbal शिंदे सरकारसाठी डोकेदुखी का ठरत आहेत? पाहा व्हिडिओ

एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात हे एकत्र येणार आहेत. ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तर मालिका विभागात ‘रमा राघव’,’भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका स्पर्धेत आहेत.

Extramarital affair : विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार का? पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणून प्रसाद ओकला (Prasad Oak) ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात राज्य केले. ( Marathi Movie) नाटक, मालिका किंवा चित्रपट, या सर्वच माध्यामातील भूमिकांमुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो महापरिनिर्वाण (Mahaparinirvana Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे.

प्रसाद ओकने नुकतंच सोशल मीडियावर (Social media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पाठमोरा दिसत आहे. त्याच्या शर्टावर काहीतरी डाग लागल्याचे बघायला मिळत आहे. तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याचे देखील दिसत आहे. याला कॅप्शन देत त्याने या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.“महापरिनिर्वाण” दिन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन… 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. तेव्हा घडलेला प्रसंग “महापरिनिर्वाण” या सिनेमाच्या माध्यमातून लवकरच दाखवण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube