प्राईम व्हिडिओ अन् ऋतिक रोशनची HRX फिल्म्स साकारणार थ्रिलर सीरिज लवकरच सुरू होणार स्टॉर्म’चं शूटिंग

Prime Video and Hrithik Roshan यांच्यात रोमांचक भागीदारी झाली आहे. त्यांची थ्रिलर ड्रामा सीरिज ‘स्टॉर्म’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prime Video And Hrithik Roshan

Prime Video and Hrithik Roshan’s HRX Films to produce thriller series ‘Storm’ to begin shooting soon : मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित, गूढ, स्वप्नं आणि कठीण परिस्थितींमध्ये टिकून राहण्याची कथा सांगणारी थ्रिलर ड्रामा सीरिज ‘स्टॉर्म’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी प्राईम व्हिडिओ आणि ऋतिक रोशनच्या HRX फिल्म्स (फिल्मक्राफ्ट प्रोडक्शन्सचा एक भाग) यांच्यात एक रोमांचक भागीदारी झाली आहे.

नवाजुद्दीन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका? इस्टाग्राम स्टोरीने उत्सुकता वाढवली…

ऋतिक रोशन ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असून, ‘स्टॉर्म’च्या निर्मितीची धुरा त्यांनी आणि ईशान रोशन यांनी सांभाळली आहे.
ही ओरिजिनल सीरिज अजीतपाल सिंह यांनी तयार आणि दिग्दर्शित केली असून, कथा अजीतपाल सिंह, फ्रांस्वा लुनेल आणि स्वाति दास यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. ‘स्टॉर्म’ ही ऋतिक रोशनसाठी ओटीटीवर निर्माता म्हणून केलेली पहिलीवहिली प्रस्तुती आहे. या सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथु, आलया एफ, सृष्टि श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद यांसारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या थ्रिलर सीरिजचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून, तिची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या, रोमांचक जगात घेऊन जाणार आहे.

Nobel Prize : डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं; मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

प्राईम व्हिडिओचे APAC आणि MENA विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट गौरव गांधी म्हणाले, “आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की आम्ही कलाकार आणि क्रिएटिव्ह लोकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. ऋतिक रोशन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि सर्जनशील कलाकार आहेत. HRX फिल्म्ससोबतचा हा सहयोग आमच्यासाठी खास आहे. ‘स्टॉर्म’ केवळ एक सीरिज नसून, हे एक नवीन आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रारंभबिंदू आहे.”

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’ ‘या’ दिवशी भेटीला येणार चित्रपट

ते पुढे म्हणाले, “या सीरिजच्या निर्मितीदरम्यान आम्हाला खूप चांगला अनुभव मिळाला. ऋतिकची विशिष्ट दृष्टिकोन आणि ईशान रोशनचा जोश यामुळे ही कथा आणखीनच प्रभावी झाली आहे. ‘स्टॉर्म’मध्ये बळकट महिला पात्रं आणि एक अत्यंत गुंतवून ठेवणारी कथा आहे, जी जगभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

स्टार परिवारची 25 वर्षे! 25 अद्भुत माता आणि अनुपमाचा अविस्मरणीय डान्स

ऋतिक रोशन यांनी यावेळी सांगितले, “‘स्टॉर्म’ने मला ओटीटी विश्वात निर्माता म्हणून माझ्या प्रवासाची सुरुवात करण्याची संधी दिली. प्राईम व्हिडिओसोबत काम करणं ही माझ्यासाठी एक नैसर्गिक निवड होती, कारण ते दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखले जातात.”

गुन्हेगार परदेशात, खासदार मोहोळांचं मात्र मौन, गुन्हेगारीवर प्रश्न टाळत मॅरेथॉनचीच चर्चा

ते पुढे म्हणाले, “‘स्टॉर्म’कडे मला जे आकर्षित करतं, ती म्हणजे अजीतपाल यांनी निर्माण केलेली सत्य आणि भावनांनी भरलेली गुंतवणारी कथा. यात असलेली पात्रं गडद, ठळक आणि लक्षात राहणारी आहेत, ज्यांना अत्यंत गुणी कलाकार साकारत आहेत. ही सीरिज केवळ भारतापुरती मर्यादित नसून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांशी नातं जोडू शकेल. मला अत्यंत आनंद होत आहे की लवकरच प्रेक्षक प्राईम व्हिडिओवर ही भन्नाट कथा पाहणार आहेत.”

follow us