माझ्यावर पुन्हा राग काढायला तयार राहा; ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये पूर्वा शिंदेची खलनायिकेच्या भूमिकेत एन्ट्री 

Inspector Manju : 'सन मराठी' वरील 'इन्स्पेक्टर मंजू' मालिका नवनवीन ट्विस्टसह रंजक वळणार आली आहे. मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्यापासून त्याने

Inspector Manju

Inspector Manju : ‘सन मराठी’ वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिका नवनवीन ट्विस्टसह रंजक वळणार आली आहे. मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्यापासून त्याने सत्या आणि मंजूमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मोठा डाव आखला. मंजूसोबत लग्न करण्याचाही त्याचा प्लॅन होता. मात्र मंजूने त्याचा हा प्लॅन उधळून लावत आर्यनची बिनलग्नाची वरात काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी मंजूने दुर्गेचं रूप धारण केलं.आता मालिकेत आणखी एक मोठं वळण आलं आहे. इन्स्पेक्टर मंजूची हेड पोलीस अधिकारी पूर्वा पाटीलची एन्ट्री झाली आहे.

पूर्वा पाटील म्हणजेच तात्यासाहेबांची मुलगी सत्याचा बदला घ्यायला आलीये. खलनायिका म्हणून सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे या भूमिकेत पाहायला मिळतेय. आता पूर्वाच्या येण्याने सत्या आणि मंजूच्या नात्यात कोणतं नवीन वळण येणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ही मालिका दररोज रात्री 8 वाजता सन मराठीवर प्रदर्शित होते.

या नव्या भूमिकेबद्दल पूर्वा म्हणाली की,”भूमिकेचं नाव आणि स्वतःच नाव सारखं असणं क्वचित पाहायला मिळत. माझ्या भूमिकेचं नाव ही पूर्वा असल्याने मला खूप आनंद झाला आहे. नाव सारखं असलं तरीही खऱ्या आयुष्यात मी वेगळी आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत DYSP पूर्वा  पाटील  ही भूमिका साकारत आहे. पूर्वा ही तात्यासाहेबांची मुलगी असल्यामुळे सत्या- मंजूला धडा शिकवायचा हे ती ठरवून आली आहे.

मुळात ती पोलीस अधिकारी असल्यामुळे सत्या मंजूचे धागे दोरे तिच्या हातात आहेत. जेव्हा मला या भूमिकेबद्दल सांगितल तेव्हा मी लगेचच होकार दिला कारण, पोलिस अधिकारी ही भूमिका त्यात खलनायिकेच रूप मी कधी साकारलं नव्हतं.”

यापुढे पूर्वा म्हणाली की, ” पहिल्यांदा पोलिसांची वर्दी घातली अगदी त्या क्षणापासून माझा पूर्ण लुक बदलला. नकळत एक रुबाब, एक शिस्त आणि एक जबाबदारी अंगात आली. त्या वर्दीमध्ये खरंच एक वेगळीच जादू आहे. मी NCC कँडिडेट असल्याने मला त्या गणवेशाबद्दल आधीपासूनच खूप प्रेम, आकर्षण होतं. त्यामुळे मला हे पात्र साकारताना खूप मज्जा येतेय. पूर्वा पाटील या भूमिकेमुळे मी पुन्हा एकदा खलनायिकेच्या रूपात प्रेक्षकांना दिसत आहे.

गौतम अदानींना अमेरिकेत मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात सर्व आरोप मागे अन् खटला कायमस्वरूपी बंद

आता “DYSP पूर्वा” सत्या आणि मंजिरीच्या आयुष्यात वादळ घेऊन आली आहे. पूर्वा ज्या ठिकाणी प्रवेश करते, तिथे सगळ्यांचं लक्ष आपोआप तिच्याकडेच जातं. आतापर्यंत प्रेक्षकांनी माझ्या भूमिकेवर कायम प्रेम केलं आहे. खलनायिका साकारल्यामुळे प्रेक्षकांनी माझ्यावर राग काढला आहे. पण हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे तयार राहा माझ्यावर भरपूर राग काढण्यासाठी.'”

follow us