Pushpa 2 च्या पहिल्या वहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट; रॉकस्टार डीएसपी पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज

'पुष्पा 2: द रुल'च्या ( Pushpa 2 ) निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पहिल्या सिंगल 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो रिलीज ( Promo Out ) केला आहे.

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T182318.162

Pushpa 2 Films First Songs Promo Out : ‘पुष्पा 2: द रुल’च्या ( Pushpa 2 ) निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पहिल्या सिंगल ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याचा प्रोमो रिलीज ( Promo Out ) केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP ) यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे यात शंका नाही. ‘पुष्पा: द राईज’चे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता या गाण्याची मज्जा अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

नाशिकसाठी CM शिंदेंचा आटापिटा; भुजबळांनी मात्र एकाच वाक्यात पिक्चर क्लिअर केला

” पुष्पा पुष्पा ” हे पूर्ण गाणे 1 मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत.रॉकस्टार डीएसपीच्या व्यस्त म्युझिकल लाइनअपबद्दल बोलत असताना यंदाच्या वर्षी ते उत्तम प्रोजेक्ट्स करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा 2: द रुल’ व्यतिरिक्त डीएसपी कडे सुरिया स्टारर ‘कंगुवा’, राम चरणचा पुढचा, ज्याचे तात्पुरते शीर्षक ‘आरसी 17’ आहे, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजित आहे. कुमार स्टारर ‘गुड बॅड अग्ली’, धनुषचा ‘कुबेरा’ आणि नागा चैतन्यचा ‘थंडेल’ असे अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहे.

मंत्री विखेंनी साधला शेतक-यांशी संवाद; सरकार पाठीशी असल्याची दिली ग्वाही

दरम्यान लीजपूर्वीच ‘पुष्पा 2’ने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. अल्लू अर्जुन च्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू झाले नसून चित्रपटाने जोरदार व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार अल्लू अर्जुनचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच त्याची कमाई 1 हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. ‘पुष्पा’ एक मोठा ब्रँड बनला आहे. या चित्रपटाच्या इतर भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us