R Madhavan : आर माधवनच्या लेकाची कौतुकास्पद कामगिरी! देशासाठी जिंकली 5 सुवर्ण पदकं

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T102206.002

R Madhavan Son Gets Medals For India: बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर (Social media) चर्चेला येत असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे दिसून येत आहे. पण अभिनेता आर माधवनच्या (R Madhavan) बाबतीत मात्र असं घडले नाही.

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आर माधवनचा मुलगा (R Madhavan Son) वेदांत देशाकरिता सतत मेडल जिंकत आहे. (R Madhavan Son Gets Medals For India) तो स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल्स जिंकत आपल्या बाबांचे आणि देशाचे नाव देखील उज्ज्वल करत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच वेदांतने स्विमिंगमध्ये एक नाही दोन नाही तर तब्ब्ल ५ गोल्ड मेडल्स जिंकले आहेत.

आर माधवनने एक पोस्ट आणि काही फोटो शेअर करत मुलाच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. “देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर येथे शनिवार आणि रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिप, २०२३मध्ये भारतासाठी ५ सुवर्ण पदकं जिंकली आहेत. मी खूप आनंदित आणि कृतज्ञ,” असं माधवनने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण

आर माधवनचा मुलगा आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असलेल्या वेदांतच्या या कामगिरीवर सध्या जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह राजकीय नेतेमंडळी देखील वेदांतचं कौतुक करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, वेदांतने देशासाठी पदकं जिंकण्याची ही पहिली वेळ नाही.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

याअगोदर देखील त्याने फ्रिस्टाइल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड मोडला होता, तसेच अनेक देशात आयोजित स्पर्धेमध्ये देशासाठी सुवर्ण पदकासह इतर पदकं देखील जिंकली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube