Video: दिशा परमार आणि राहुल वैद्य लवकरच होणार आई-बाबा? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T095711.821

Disha Parmar Rahul Vaidya Good News : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) 2021 साली लग्नबंधनात अडकले होते. आता दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)


दिशा परमार आणि राहुल वैद्यने थोड्या हटके पद्धतीने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही आनंदात दिसून येत आहेत. राहुल वैद्यच्या हातात एक पाटी आहे. या पाटीवर ‘आई आणि बाबा’ असं लिहिले असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करण्याबरोबरच त्यांनी सोनोग्राफी रुममधला एक फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केला आहे. हा बाळाचा अल्ट्रासाऊंड फोटो लक्ष वेधून घेत आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमारने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे की,”आई-बाबा आणि बाळातर्फे सर्वांना नमस्कार”. राहुल आणि दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहुलने काळा टीशर्ट आणि जीन्स तर दिशाने काळ्या रंगाचा वनपीस घातल्याचे दिसत आहे. दोघेही खूप आनंदात दिसून येत आहेत. दिशाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

तसेच राहुल वैद्य आणि दिशा परमारचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ देखील घालत आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा मोठा वर्षाव करत आहेत. मौनी रॉय, जस्मीन भसीन, वरुण सूद, अनीता हसनंदानी, अली गोनीसह अनेक सेलिब्रिटींनी राहुल आणि दिशाला शुभेच्छा देत आहेत.

राहुल आणि दिशा यांनी १६ जुलै २०२१ मध्ये लग्न केले आहे. राहुलनं दिशाला बिग बॉस १४ मध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याची मोठी चर्चा रंगली होती. ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती.

Tags

follow us