‘राजा शिवाजी’ ची ऐतिहासिक घोडदौड कायम! रेकॉर्डब्रेक ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई
Raja Shivaji चित्रपटाने महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विक्रमी ओपनिंग करत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे.
‘Raja Shivaji’ continues its historic run! Strong earnings on the second day after record-breaking opening : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित बहुचर्चित ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विक्रमी ओपनिंग करत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही आपली मजबूत पकड कायम ठेवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’
शनिवारी चित्रपटाने तब्बल ₹11.50 कोटी नेट इतकी कमाई करत प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद आणि चित्रपटाबद्दलची वाढती उत्सुकता अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक अनुभव न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव ठरत आहे. राज्यभरातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत. कुटुंबांसह चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत असून, ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील वर्षातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.
तमिळनाडूमध्ये फिल्मी चमत्कार! अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी… DMK ला धक्का
बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (इंडिया नेट):
पहिला दिवस (शुक्रवार): ₹12.40 कोटी
दुसरा दिवस (शनिवार): ₹11.50 कोटी
एकूण: ₹23.90 कोटी नेट
भारतातील EV मार्केटमध्ये तेजी, चार महिन्यांत 79 हजार विक्री; टाटा आघाडीवर, महिंद्राची मोठी झेप
मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये समीक्षकांकडून मिळालेल्या एकमुखी स्तुतीसह प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सकारात्मक ‘वर्ड ऑफ माउथ’ आणि दमदार विकेंड मोमेंटमच्या जोरावर ‘राजा शिवाजी’ आगामी दिवसांत आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
देशाच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीला मोदी शाहंच्या भाजपने जोरदार धक्का दिला आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना नवख्या अभिनेता विजच्या टीव्हीकेने मात दिली. तर केरळमध्ये जनतेने पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली परंपरा कायम ठेवत पिनराई विजयन यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.