Rakha Bandhan : बॉलिवूडमधील सावत्र बहिण-भाऊ पण अनोख्या बॉंडिंगने वेधतात लक्ष
Rakha Bandhan : रक्षाबंधन (Rakha Bandhan) या सणाला संपूर्ण भारत भरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सेलिब्रेटी आणि बॉलिवूडमधील भावा-बहिण्यांच्या जोड्या देखील ही सण उत्साहात साजरा करतात. तसेच बॉलिवूडमधील काही बहिण- भावाच्या जोड्या या सावत्र बहिण- भावाच्या जोड्या आहेत. मात्र त्यांच्यातील अनोख्या बॉंडिंगने ते नेहमीच चाहत्यांच लक्ष वेधतात. कोण-कोणत्या आहेत या जोड्या पाहूयात…
स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इंडिया’आघाडीच्या बैठकीला? राजू शेट्टींनी दिलं उत्तर
सनी देओल आणि इशा देओल
या जोड्यांमधील पहिली जोडी आहे ती म्हणजे सध्या गदर 2 मुळे प्रचंड चर्चेत असलेला अभिनेता सनी देओल आणि त्याचे भावंड त्यांच्या या बॉंडिंगने ते नेहमीच सोशल मीडिया आणि मीडियावर चाहत्यांच लक्ष वेधून घेत असतात. सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे मुलं तर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांना ईशा आणि अहना दोन मुली आहेत. या सर्व सावत्र बहिण-भावांचे एकमेकांवरील प्रेम वारंवार दिसले आहे.
आशिया चषकात शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सचिन तेंडुलकर नंबर वन
अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर
दुसरी जोडी आहे ती म्हणजे कपूर घराण्यातील सावत्र बहिण-भाऊ अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर. बोनी कपूर यांना पहिली पत्नी मोना यांची दोन मुलं म्हणजे अर्जुन आणि अंशला तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. या बहिण भावांमध्ये सुरूवातीला चांगले संबंध नव्हते. मात्र श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने त्याचं मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडलं. त्यावेळी अर्जुन आणि जान्हवी हे दोघे ही जवळ आले. त्यांचे चांगले संबंध आता नेहमीच पाहायला मिळतात. जान्हवीच्या अनेक पोस्टवर कामावर कमेंट करत अर्जुन तिला दाद देत असतो.
आलिया भट आणि राहुल भट
त्यानंतरची जोडी आहे ती म्हणजे सध्या बॉलिवूडवर आपल्या अभिनयासह सौंदर्याची मोहिनी घालणारी आलिया भट आणि तिचा सावत्र भाऊ राहुल भट. प्रसिद्ध निर्माते महेश भट यांनी देखील दोन लग्न केले त्यात त्यांच्या पहिल्या पत्नीला दोन मुल आहेत. राहुल आणि पुजा तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीला आलिया आणि शाहिन या दोन मुली आहेत. या भावा-बहिणींमध्ये देखील सख्या भावा-बहिणींप्रमाणे बॉंडिंग पाहायला मिळते.
सारा अली खान आणि तैमुर अली खान
चौथी आणि शेवटची जोडी आहे ती म्हणजे सध्या कायम चर्चेत असणारी तसेच सोशल मीडियावर नेहमी दिसणारे बहिण-भाऊ ते म्हणजे सारा अली खान आणि तैमुर अली खान ती दरवर्षी तिच्या सख्यासह सावत्र भावांना राखी बांधते. साराचे वडिल सैफ अली खानला पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम हे दोन मुलं आहेत. तर दुसरी पत्नी करीना कपूरपासून तैमुर आणि जहांगीर हे दोन मुलं आहेत या भावंडांमध्ये देखील नेहमीच बॉडिंग पाहायला मिळतं.