Rakhi Sawant: राखीची प्रकृती गंभीर, अभिनेत्रीच्या गर्भाशयात गाठ; Ex पती रितेशने दिली माहिती, म्हणाला…
Rakhi Sawant Tumour in Uterus: रुग्णालयात दाखल असलेल्या राखी सावंतबाबत (Rakhi Sawant) एक नवीन अपडेट समोर आले आहे. अभिनेत्रीचा माजी पती रितेशने तिच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे की, छातीत दुखत आणि पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे आढळून आले. मात्र, आता ऑपरेशननंतर राखी बरी होत आहे.
View this post on Instagram
गर्भाशयात ट्यूमर
न्यूज 18 शी बोलताना माजी पती रितेश राज सिंह म्हणाला की, ‘छातीत दुखणे आणि पोटात दुखणे अचानक झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे आढळून आले. हा कॅन्सर असावा असे डॉक्टरांना वाटले. मात्र, सर्व चाचण्या झाल्या असून आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे.
राखी तब्येतीत सुधारणा
शस्त्रक्रियेनंतर राखी सावंत बरी आहे. रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. रितेश व्हिडिओमध्ये म्हणाला की, ‘मित्रांनो, आता राखी ठीक आहे. काल बराच वेळ तिच्याशी बोललो. डॉक्टर तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देतील अशी शक्यता आहे. परवा तिची प्रकृती पाहता तिला बराच काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल असे वाटत होते. पण ती आता स्थिर आहे.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘मडगाव एक्स्प्रेस’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा…
आदिल दुर्रानी यांनी राखी सावंतच्या तब्येतीवर एका नव्या ड्रामाविषयी सांगितले आहे. न्यूज 18 शोशाशी बोलताना आदिल म्हणाला की, ‘अद्याप कोणताही वैद्यकीय अहवाल आलेला नाही. डॉक्टरांचे म्हणणेही आलेले नाही. तो कोणत्या रुग्णालयात दाखल आहे, हेही देखील माहीत नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंटला ऑक्सिजनचे मार्क्स दिले जातात, पण तेही मिळाले नाही. तिला पोलिसांना शरण जावे लागू नये आणि तुरुंगात जावे लागू नये म्हणून ती हे करत आहे. असे काही आहे असे मला वाटत नाही. जेव्हा मी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा अनेकदा संपूर्ण बॉडी चेकअप झाली. तिला या पद्धतीची कोणतीही अडचण नसल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.
View this post on Instagram